भाग्यश्री मोकाटे यांना उद्धव ठाकरे कसा न्याय देणार?

शेंडी येथून मोटारसायकल रॅली काढून नगरला सभास्थळी शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
भाग्यश्री मोकाटे यांना उद्धव ठाकरे कसा न्याय देणार?

नगर : बनावट दारुप्रकरणात अडकलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या व जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मदत व्हावी, अशी मागणी उद्या (रविवारी) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे.

त्यासाठी शेंडी येथून मोटारसायकल रॅली काढून नगरला सभास्थळी शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे भाग्यश्री मोकाटे यांना ठाकरे कसा न्याय देणार, याबाबत आता शिवसेनेतील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करताना पांगरमल येथे दारू पिल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. ही दारू बनावट असल्याचे सिद्ध होऊन दारु वाटप करणारे, बनविणारे यांच्याबरोबरच इतरही कार्यकर्त्यांना कारागृह भोगावा लागला.

जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, पोलिस अधिकारीही निलंबित झाले होते. ही दारू मोकाटे यांच्या गटाने पाजल्याचा आरोप होऊन निवडून आलेल्या भाग्यश्री मोकाटे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून त्या फरार आहेत. हे आरोप राजकीय वादातून आपल्यावर झाल्याचे सांगत मोकाटे यांनी आपल्याला शिवसेनेने पक्षीय पातळीवर सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. हा विषय न्यायकक्षेत असल्याने उद्धव ठाकरे याबाबत काय बोलतात, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com