bhagwangad pankaja prohibition | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भगवानगड : पंकजा मुंडे यांना आता कायद्याचा बडगा! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यात येणार असल्याचे शेवगावचे भाजपचे नेते अरुण मुंडे यांनी यांनी जाहीर केले. मात्र त्याला विरोध करीत नगच्या पिपल्स हेल्पलाईन या संघटनेने कायदाचा बडगा उगारला आहे.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना गडाचा वापर राजकीय कारणासाठी करू देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

नगर : भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यात येणार असल्याचे शेवगावचे भाजपचे नेते अरुण मुंडे यांनी यांनी जाहीर केले. मात्र त्याला विरोध करीत नगच्या पिपल्स हेल्पलाईन या संघटनेने कायदाचा बडगा उगारला आहे.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना गडाचा वापर राजकीय कारणासाठी करू देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

भगवान गडावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण होऊ नये, यासाठी गडावर राजकीय भाषणांना नामदेव शास्त्रींनी बंदी घातली आहे. गतवर्षी त्यांनी गडावर मेळावा होऊ दिला नाही. या वर्षी हा मेळावा गडावरच घेण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शास्त्रींनी गडावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यातच भर म्हणून नगरच्या पिपल्स हेल्पलाईन या संघटनेने महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना केलेला विरोध कायद्याशी सुसंगत असल्याचे सांगून पंकजा मुंडे यांना विरोध दर्शविला आहे. राजकीय स्वार्थासाठीच गडावर भाषणात मुंडे यांना स्वारस्य वाटते, असा आरोप संघटनेने केला आहे. 

उच्च न्यायालयात दाद मागणार 
गडाचा वापर राजकीय कारणासाठी केल्यास धार्मिक स्थळाचा दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय कारणासाठी गडाचा वापर करता येणार नाही. त्यामुळे गडावर सभेस परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरीत औरंगाबाद खंडपिठात प्रशासन व सरकारविरोधात दाद मागण्यात येईल, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याचे ऍड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख