उस्मानाबादेत ओमराजे जिंकले तर माझी मोटारसायकल तुमची : स्टॅंप पेपरवर दिले लिहून

उस्मानाबादेत ओमराजे जिंकले तर माझी मोटारसायकल तुमची : स्टॅंप पेपरवर दिले लिहून

पुणे -"उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत जर शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर निवडून आले तर मी माझी बजाज कंपनीची  मोटरसायकल तुमच्या नावावर करून देईन, "असा करारनामा रघुजीवाडी येथील शंकर मोरे यांनी त्याच बाजीराव करवर गावातील यांना लिहून दिला आहे. मात्र ओमराजे हरले तर करवर यांनी  त्यांची मोटरसायकल माझ्या नावावर करून दिली पाहिजे.' असेही या करारात म्हटले आहे.
 
निवडणुकीच्या काळात अनेकदा दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पैजा लागतात,या पैजा अगदी शंभर रुपयापासून हजार रुपयापर्यंत असतात. अनेकदा जेवणावळीची पैज लागते मात्र  राज्यभर लक्षवेधी ठरलेल्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी एक आगळीवेगळी पैज लागली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राणा जगजितसिंग आणि सेनेचे ओमराजे निंबाळकर या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत ही निवडणूक रंगली होती. आता तेथील प्रचाराचा धुरळा बंद झाला आहे.

उस्मानाबाद  जिल्ह्यातील  राघूची वाडी  गावातील शंकर मोरे यांनी जर ओमराजे जिंकले तर: बाजीराव करवर यांच्या नावावर २४ मे २०१९ या दिवशी आपली मोटरसायकल करून देईल असा करारनामा केला आहे. जर करवर हे पैज हरले तर त्यांनी त्यांची  मोटरसायकल आपल्या नावावर करून दयावी, असे या करारात म्हटले आहे. या आगळ्यावेगळ्या करारनाम्यावर त्याच गावातील सहदेव नामदास आणि विकास गोरवे यांच्या साक्षीदार म्हणून सहया आहेत. 

या निवडणुकीत प्रचारादरम्यान पाटील आणि निंबाळकर यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते तोच ज्वर खाली कार्यकर्त्यात आला असल्याचे या आगळ्यावेगळ्या पैजेवरून दिसून येते.

उस्मानाबाद मतदारसंघासाठी 18 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर ही पैज लागली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या पैजेची माहिती टि्वटरवरून दिली आणि राष्ट्रवादीची परिस्थिती राज्यात सुधारत असल्याचा दावा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com