best strike, udhav thakray, mumbai | Sarkarnama

मुंबईकरानो, त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो 

sarkarnama
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मुंबई : बेस्ट संपामुळे मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल भावना व्यक्त केल्या. अखेर तासानंतर उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, " मी स्वतः पगाराबाबत हमी देतो. संप मागे घ्यावा. यूनियनने संप मागे घ्यावे. आपल दुखन मला कळले आहे. तुमच्या मागण्या आम्हाला कळल्या आहेत. आम्ही बेस्टच्या कर्मचाऱ्याची जबाबदारी घेत आहोत. यापुढे बेस्टची सर्व जबाबदारी आम्ही स्विकारतो असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्ट मंडळाला दिला. 

त्यानंतर कामगार नेता शशांक राव यांनी सांगितले,"" कालपर्यंत लिहून मागत होतो. पण आता उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता आम्ही संप मागे घेत आहोत. सणासुधीच्या काळी मुंबईकरांना त्रास होऊ नये. कामगार आता कामावर रुजू होतील असे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.''  

संबंधित लेख