beed zp | Sarkarnama

बीड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पतीनेच घेतला ग्रामसेवकांचा वर्ग

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मे 2017

बीड : राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून 50 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले. तेवढ्या प्रमाणात महिला राजकारणात निवडून देखील येत आहेत.

पण स्वतंत्रपणे कारभार करण्याचा त्यांच्या हक्क मात्र त्यांच्या पतीराजांकडून हिरावला जातो. ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व आमदार म्हणून निवडून आलेल्या महिलांच्या कामात त्यांचे पतीच लुडबूड करतात असा अनुभव अनेक ठिकाणी अनेकवेळा आलेला आहे. असाच प्रकार नुकताच बीडमध्ये घडलाय. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता गोल्हार यांचे पती विजय गोल्हार यांनी आष्टीत येऊन ग्रामसेवकांचा वर्ग घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोल्हार यांनी सरपंच व ग्रामसेवकांना 'गाळमुक्त तलाव, गाळमुक्त शिवार'वर मार्गदर्शन केल्याने महिलाराज वर पतीराजची पंरपरा पुुढे सुरु असल्याचे यावरून स्पष्ट झाले. 

राज्य शासनातर्फे सध्या 'गाळमुक्त तलाव, गाळमुक्त शिवार' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी आष्टीतील पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकास योजनांबाबत सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार असे सगळेच उपस्थित होते. या शिवाय सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विद्यमान सदस्यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. पण त्यांच्या ऐवजी त्यांचे पती विजय गोल्हार आले आणि त्यांनीच सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली.

गोल्हार यांचे ग्रामसेवक, सरपंचांना सखोल मार्गदर्शन सुरु झाल्यामुळे बाकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मग मौन बाळगणेच पसंत केले. 

संबंधित लेख