beed maratha kranti morcha | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात आत्महत्या, राज्यातला सातवा बळी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

बीड : मराठा आरक्षण मागणीचा जिल्ह्यात पहिला आणि राज्यातील सातवा बळी मंगळवारी (ता. ) गेला. अभिजित बाळासाहेब देशमुख (वय 35, रा. विडा, ता. केज) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर बॅंकेचे कर्जही थकीत होते. 

आरक्षण दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बॅंकेचे कर्जही मिळत नसल्याचे तो मित्रांशी बोलत होता. दरम्यान, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला. आरक्षण मागणीसाठी सहा बळी गेल्यानंतर "मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार" असल्याचे त्याने सोमवारी रात्रीही बोलून दाखविले होते असे डॉ. धनराज पवार यांनी सांगितले. अभिजित देशमुख याने मंगळवारी सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बॅंकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार श्री. ढाकणे यांनी पंचनामा केला असून त्यातही तसा उल्लेख आहे. 

संबंधित लेख