beed jilha bank fatwa | Sarkarnama

बीड जिल्हा बॅंकेने शेतकरी विरोधी फतवा मागे घ्यावा : धनंजय मुंडे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

बीड : पाऊस नसल्याने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आता पिक कर्जासाठी उघडपणे अडवणुक सुरू केली आहे. आमच्या बॅंकेचे बेबाकी प्रमाणपत्र असल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका असा अजब आणि नियमबाह्य फतवा बीड जिल्हा बॅंकेने जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांना बजावला आहे. हा फतवा मागे घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

बीड : पाऊस नसल्याने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आता पिक कर्जासाठी उघडपणे अडवणुक सुरू केली आहे. आमच्या बॅंकेचे बेबाकी प्रमाणपत्र असल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका असा अजब आणि नियमबाह्य फतवा बीड जिल्हा बॅंकेने जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांना बजावला आहे. हा फतवा मागे घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना कर्ज मिळू नये आणि शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा जिल्हा बॅंकेचा डाव असून याला अधिकारी, संचालक आणि ज्यांच्या ताब्यात बॅंक आहे त्याचे पालक जबाबदार आहेत असा गंभीर आरोपही मुंडे यांनी केला आहे. बॅंकेवर पंकजा मुंडे यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळ कार्यरत आहे. 

अधिकारी आणि बॅंकेच्या संचालक मंडळावर कारवाई करावीची मागणीही मुंडे यांनी केली. शासनाने 800 कोटी रूपयांची जाहिरातबाजी करून कर्जमाफी केल्याचा दिखावा केला असला तरी आजही असंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण मराठवाड्यात सर्वात जास्त असतांना भाजपाच्या ताब्यातील डिसीसी बॅंकेने या शेतकऱ्यांची पिक कर्जासाठी आडवणुक सुरू केली आहे. 

जिल्हा बॅंकेने जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंका, महाराष्ट्र ग्रामिण बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र च्या सर्व शाखांना एक पत्र पाठवुन आमच्या बॅंकेचे बेबाकी प्रमाणपत्र असल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका असा फतवा काढला आहे. बॅंकांना कुठल्याही प्रकारचे निर्देश देण्याचे अधिकार हे रिजर्व बॅंकेला असतांना जिल्हा मध्यवर्ती बॅंक असे आदेश देऊच कसे शकते असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

स्वतःच्या बॅंकेला कर्जमाफी योजनेतुन 350 कोटी रूपयांचा लाभ मिळणे आवश्‍यक असतांना केवळ 142 कोटी रूपयांचाच फायदा झाला असल्याचे बॅंकेने आपल्या पत्रात म्हटले आहे. सभासद शेतकरी बेबाकी प्रणापत्र खोटी सादर करून बॅंके मार्फत कर्ज उचलतात असा शेतकऱ्यांवर खोटारडे पणाचा आरोपही बॅंकेने काढलेल्या या फतव्यात करण्यात आला आहे. 

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक अडचणी न काढता शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा असे आदेश दिले असतांना आमच्या बॅंकेचे बेबाकी प्रमाणपत्र असल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका असा बीड जिल्हा बॅंकेने काढलेला फतवा शेतकरी विरोधी आणि कायद्याच्या कोणत्याही चौकटीत न बसणारा आहे. 
]
शेतकऱ्यांची अडवणुक करायची त्यांना इतर बॅंकेकडुनही कर्ज मिळु द्यायचे नाही आणि आत्महत्येस प्रवृत्त करायचे असा बॅंकेचा डाव आहे. यास बॅंकेचे अधिकारीच नव्हे तर बॅंकेचे संचालक मंडळ आणि ज्यांच्या ताब्यात बॅंक आहे ते पालकही जबाबदार असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख