Beed : educational institutions will remain closed : Deshmukh | Sarkarnama

बीड जिल्ह्यात शाळा महाविद्यालये गुरुवारी बंद : शिक्षण सभापती देशमुख

दत्ता देशमुख
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे परळीत झालेल्या ठिय्या आंदोलनात शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. क्रांती मोर्चातर्फे बंद पुकारलेला असताना शाळा महाविद्यालये सुरु राहील्याने विद्यार्थ्यांना अडचणी येतील असे श्री. देशमुख म्हणाले

.बीड : मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर बंद पुकारलेला असल्याने शाळा - महाविद्यालये सुरु राहीली तर विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शाळा - महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी सांगीतले. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत आदेश दिले आहेत. 

मराठा आरक्षण मागणीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत. याचाच भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात बंद पुकारण्यात आला आहे. बीड शाखेकडून गुरूवारी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. बंद जरी खासगी अस्थापना, वाहतूक आणि व्यापारपेठांसाठी असला तरी या काळात शाळा - महाविद्यालये सुरु ठेवली तर विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शैक्षणिक बंदची भूमिका मांडल्याचे राजेसाहेब देशमुख म्हणाले. याबाबत आपण प्रशासनाला केलेली विनंती मान्य करण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगीतले. 

संबंधित लेख