beed-chhagan-bhujbal-sharad-pawar-samata-parishad-meet | Sarkarnama

समतेसाठी लढणाऱ्या शरद पवारांची साथ सोडणार नाही : भुजबळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

समता परिषदेच्या पहिल्या मेळाव्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करुन आरक्षण देण्याची मागणी आम्ही केली. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी ही मागणी मान्य केली. शरद पवार यांनी समतेसाठी कायम लढा दिलेला असून त्यांची साथ सोडणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

बीड : समता परिषदेच्या पहिल्या मेळाव्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करुन आरक्षण देण्याची मागणी आम्ही केली. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी ही मागणी मान्य केली. शरद पवार यांनी समतेसाठी कायम लढा दिलेला असून त्यांची साथ सोडणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

बीड येथे आयेाजित समता मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनेकवेळा उल्लेख करुन ओबीसी चळवळीला बळ दिल्याचे म्हटले. 

आज आपण स्वत:सह व्यासपीठावरील महिला व इतर घटकांना आरक्षणामुळे मिळालेली पदे शरद पवार यांच्यामुळे आहेत. त्यांना सोडण्याचा प्रश्नच नाही असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी कायम ओबीसी चळवळीला साथ दिल्याचे त्यांनी सांगीतले. मधल्या काळात शिवसेना नेत्यांच्या भेटी आणि काही निवडणुकांत भुजबळ समर्थकांनी शिवसेनेच्या विजयासाठी मदत केल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा झाल्या होत्या. 

संबंधित लेख