beat like dreams who makes trouble : Raj | Sarkarnama

ढोलासारखेच संकट आणणाऱ्यांना बडवा : राज ठाकरे

ज्ञानेश सावंत
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे : ""जेवढ्या जोरात ढोल बडवता तितक्‍याच ताकदीने आपल्या महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना बडवा,'' असे सल्ला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

पुणे : ""जेवढ्या जोरात ढोल बडवता तितक्‍याच ताकदीने आपल्या महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना बडवा,'' असे सल्ला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

इंधन दरवाढीला पालकमंत्री गिरीश बापट हे जबाबदार नसल्याचे जाहीर करीत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बापटांचे राज यांनी कौतुक केले. राज यांच्या मतला दिलाखुलासपणे दाद देत बापट राज यांच्यावर भलतेच खूष झाल्याचे दिसून आले.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर-राज ढोल ताशा करंकड स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांच्या विनंती मान देऊन छोटेखानी भाषण केले. जेमतेम चार-मिनिटांच्या भाषणात राज यांनी केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात ह्ल्ला केला.

या कार्यक्रमानिमित्त शनिवारवाड्याच्या आवारात ढोल ताशा वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करीत ते म्हणाले, ""जेवढ्या जोरात ढोल बडवता तेवढ्याच जोरात महाराष्ट्रात जे कोणी संकटे आणतील त्यांना बडवा. ढोलताशाचा आवाज ऐकल्यानंतर सगळ्यानांच आनंद होतो.`' 

राज म्हणाले, ""माझे स्वर- राज्य असले तरी, ते केवळ पासपोर्टवरतीच आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार मी राज ठाकरे या नावानेच व्यंगचित्र काढत राहिलो. माझ्या नावात संगितातील राग असला तरी, मी भलताच राग आळवत राहिलो. मला वेगळात राग येत राहिला. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यात बापटांचा दोष नाही. ''

मनसेचे मंदार बलकवडे, गणेश भोकरे, नीलेश हांडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला राज येणार असल्याने शनिवारवाड्यासह परिसरात त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

संबंधित लेख