शिवसैनिकांसारखे आंदोलक व्हा.....छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सल्ला 

मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने चेंबूर येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अविश्‍वास ठराव जिंकल्याच्या आनंदात मोदी सरकार असेल पण 2019 ला हे चित्र बदलेले असेल असा दावा करत ते म्हणाले की, एकही आश्‍वासन मोदी यांनी पुर्ण केलेलं नाही.
शिवसैनिकांसारखे आंदोलक व्हा.....छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सल्ला 

मुंबई : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात शिवसैनिक प्रत्येक प्रश्‍नावर आंदोलन करतात. पण, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आदेशाची वाट पाहत बसतात, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज स्वपक्षातील कार्यकर्त्यांना टोला लगावला. जनतेच्या प्रश्‍नावर झोकून देवून काम करा. त्यासाठी कशाला आदेश हवेत? असा सवाल करत जनतेच्या हितासाठी आंदोलन करताना डगमगू नका. असा सल्ला भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने चेंबूर येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अविश्‍वास ठराव जिंकल्याच्या आनंदात मोदी सरकार असेल पण 2019 ला हे चित्र बदलेले असेल असा दावा करत ते म्हणाले की, एकही आश्‍वासन मोदी यांनी पुर्ण केलेलं नाही. केवळ भाषण करून जनतेला भुरळ पाडली जात आहे. पण, जनता हुशार आहे. दोन कोटी तरूणांना रोजगार याबाबत त्यांच्याकडे उत्तर नाही. पंधरा लाख रूपयांचा जुमला उघड झाला आहे. त्यामुळे जनता एकदा फसते पण वारंवार फसत नाही. हा भारतीय जनतेचा स्वभाव आहे. त्याचे पडसाद 2019च्या निवडणूकीत उमटतील. असे भुजबळ म्हणाले. 

मात्र, केंद्र सरकारबाबत नाराजी वाढत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचे टाळू नये. आंदोलन करताना अटक झाल्यास कोण सोडवेल हा प्रश्‍नच मनात आणू नये. मला स्वत: अनेक वेळ आंदोलनात अटक झाली आहे. जनतेच्या हिताचे आंदोलन असेल तर झोकून देवून सहभागी व्हायला हवे, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com