bawankule minister | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यावर काळोखाचे सावट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नागपूर : नागपूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून जिल्ह्यातील जलाशयेही कोरडी पडली आहे. दुष्काळी स्थितीत वीजनिर्मितीसाठी राखीव पाणी पिण्यासाठी देण्यात येणार आहे. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच जिल्ह्यातील ग्रामीण भागात 12 तासांच्या भारनियमनाची शक्‍यता बळावली आहे. 
संपूर्ण राज्यात यंदा पाऊस कमी झाला. नागपूर जिल्हाही अपवाद नाही. त्यामुळे नागपूर शहरात महिनाभराने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंदा पाऊस कमी झाल्याने वीजनिर्मिती प्रभावित होण्याची शक्‍यता व्यक्त करीत भारनियमनाचे संकेत दिले. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास जिल्ह्यात पुन्हा एकदा भारनियमन सुरू होणार आहे. भविष्यात अशा स्थितीत बिकट शक्‍यता बघता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यप्रदेशातील चौराई धरणाचे पाणी नागपुरात आणण्याच्या योजनेवर काम सुरू करण्याचेही संकेत दिले. 

चौराई धरण ते नागपूरपर्यंत कालवा तयार करण्यासाठी 1800 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकल्पाचा लाभ भविष्यात होणार आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातील पेच धरणात केवळ 11 टक्के पाणी साठा आहे. यातूनच खापरखेडा वीजनिर्मिती केंद्रासाठी पाणी राखीव आहे. जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य बघता पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. 

मात्र, खापरखेडा वीजनिर्मितीसाठी भांडेवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होईल. परंतु येथून केवळ मर्यादित पाणी मिळणार आहे. याचा वीजनिर्मितीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यावर भारनियमनाची शक्‍यता बळावली आहे. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेकदा सभागृहात राज्यात वीजेचे उत्पादन अधिक असल्याचे सांगितले. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्याच जिल्ह्यावर भारनियमनाची वेळ येणार आहे. यातून उर्जामंत्री बावनकुळे कुठला तोडगा काढतात? याकडे आता लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख