bavankule | Sarkarnama

बावनकुळेंचाही शेतकऱ्यांशी सुसंवाद

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई : रणरणत्या उन्हामध्ये अंगाची लाही लाही होत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या त्यांच्याच भागात जावून समस्या ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 19 एप्रिलपासून राज्यातील ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला असून मेअखेरपर्यत हे अभियान कायम राहणार आहे. 

मुंबई : रणरणत्या उन्हामध्ये अंगाची लाही लाही होत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या त्यांच्याच भागात जावून समस्या ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 19 एप्रिलपासून राज्यातील ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला असून मेअखेरपर्यत हे अभियान कायम राहणार आहे. 

एप्रिल रोजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी राळेगणसिध्दी येथील शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 20 एप्रिल रोजी दिवसभर पुण्यात जावून ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. 24 एप्रिल रोजी यवतमाळ, 25 एप्रिलला बुलडाणा, 26 एप्रिल रोजी नगरला ऊर्जामंत्री बावनकुळे भेट देणार आहेत. मराठवाडा भागाचा दौरा करताना 3 मेला बीड, 4 मेला लातूर आणि 5 मेला उस्मानाबाद येथे उर्जामंत्री बावनकुळे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी 11 मे चंद्रपूर, 12 मे गडचिरोली, 13 मेला अमरावतीला बावनकुळे भेट देणार आहेत. उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे धुळे, नंदूरबार, जळगाव या ठिकाणी तर पश्‍चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी बावनकुळे भेट देणार आहेत. उत्तर महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्र भेटीच्या तारखा अद्यापि निश्‍चित झालेल्या नाहीत. 

महाराष्ट्र सरकारचा ऊर्जा विभागाच्या वतीने एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम, दीनदयाळ ग्रामविकास योजना यावर राज्यामध्ये काम करण्यात येत असून या कामाचाही आढावा ऊर्जामंत्र्यांकडून या संपर्क अभियानामध्ये घेण्यात येणार आहे. ऊर्जा विभागाकरीता केंद्र सरकारचाही मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला असून त्यार्अंतगत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वीज उपकेंद्राचेही काम सुरू करण्यात आले आहे. त्या कामाचे भूमीपुजनही संपर्क अभियानादरम्यान ठिकठिकाणी ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी ऊर्जा विभागाने उभारलेल्या सबस्टेशनचेही लोर्कापण याच अनुषगांने ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वीज उपकेंद्रांचे भूमीपुजन आणि सबस्टेशनचे लोर्कापण ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्याचा अनेक आमदारांनी आग्रह धरल्यामुळे उन्हाच्या उकाड्यामध्ये ऊर्जामंत्र्यांना ग्रामीण भागांना भेटी देण्याची वेळ आली आहे. 

या अभियानादरम्यान त्या त्या भागातील शेतकऱ्यांशी ऊर्जामंत्री बावनकुळे शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या दौऱ्यात ऊर्जा विभागाचे अधिकारीही सहभागी झाले असल्याने भेटीतच समस्यांचे निवारण करण्याचा कार्यक्रम बावनकुळे यांनी सुरू केला आहे. पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या तक्रारींचाच शेतकऱ्यांकडून पाढा वाचला जात आहे. ऊर्जामंत्री स्वत: ग्रामीण भागात फिरू लागल्यामुळे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना घाम पुसत ऊर्जामंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावे लागले आहे. निमित्त उद्घाटनाचे तसेच लोर्कापण सोहळ्याचे असले तरी ऊर्जामंत्र्यांशी थेट सुसंवाद होवून तक्रारी मांडण्याची संधी मिळाल्याने महाराष्ट्रातील बळीराजा सुखावल्याचे चित्र पहिल्या टप्प्यात पहावयास मिळाले आहे. 
 

 
 

संबंधित लेख