Battel for Gokul : DCC Bank directors throw letter bomb on Mahadik | Sarkarnama

लढाई गोकुळची : जिल्हा बॅंक संचालकांचा महाडिकांवर लेटर बॉम्ब !

सदानंद पाटील 
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

गोकुळच्या संघर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची बदनामी का? असा सवाल बॅंकेच्या संचालकांनी केला आहे.

कोल्हापूर   : गोकुळच्या संघर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची बदनामी का? असा सवाल बॅंकेच्या संचालकांनी केला आहे. माजी आमदार व बॅंकेचे ज्येष्ठ संचालक महादेवराव महाडिक यांनी बॅंकेच्या संचालकांनी दुबई आणि हैदराबाद सहलीत धिंगाणा  घातल्याचा आरोप केला. हा आरोप सिद्ध झाल्यास संचालकपदाचे राजीनामे देऊ, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

या पत्रकावर माजी खासदार श्रीमती निवेदिता माने,आर के पोवार ,श्रीमती उदयानीदेवी साळुंखे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर,संतोष पाटील, सौ. अर्चना पाटील,विलास गाताडे,राजू आवळे,असीफ फरास, भैया माने, रणजीत पाटील यांच्या सह्या आहेत. प्राध्यापक संजय मंडलिक व सर्जेराव पाटील- पेरीडकर हे दोन संचालक परगावी असल्यामुळे त्यांनी फोनवरून या पत्रकाला पाठिंबा दिला आहे. 

महाडिक यांच्या सैरभैर वक्तव्याने आमची अब्रू वेशीवर टांगलेली नसून बॅंकेचीच नाहक बदनामी होत आहे. सन 2009 ते 2014 या काळात बॅंकेवर प्रशासक मंडळ कार्यरत होते. साडेतीन वर्षांपूर्वी प्रशासकांची कारकीर्द जाऊन विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाची सत्ता आली. त्यानंतर बॅंकेने घेतलेली गरुडभरारी निश्‍चितच कौतुकास्पद आहे.या संचालक मंडळात स्वतः महाडिक यांच्यासह त्यांना मानणारे संचालकही आहेत. 

मॉरिशसला गेलेल्या सहलीचा खर्च ज्या त्या संचालकांनी व्यक्तिगत स्वतःच्या खिशातून केला आहे.या सहलीमध्ये बॅंकेचा एक रुपयासुद्धा खर्च झाला नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच हैद्राबाद सहलीमध्येही स्पॉन्सर न्हवता. या दोन्ही सहलींमध्ये संचालक मंडळातील सहकाऱ्यांसोबत आमच्या महिला भगिनी सुद्धा सहभागी होत्या. किमान त्यांचा अपमान करताना तरी महाडीक यांनी थोडा तरी संयम पाळायला हवा होता, असेही नमूद करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख