पवारसाहेब आले नाहीत, पण, अजितदादांनी उणीव भरून काढली 

पवारसाहेब आले नाहीत, पण, अजितदादांनी उणीव भरून काढली 

शहापूर (जि.ठाणे) : भव्य लग्न मंडपाच्या बाहेर वारली, आदिवासी नृत्य रंगात आलेले, रांगोळ्यांनी वातावरणात आलेली प्रसन्नता, फटाक्‍यांची आतषबाजी, अशा मंगलमय वातावरणात शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मुलाचा आणि मुलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात काल (शनिवारी) येथे पार पडला.

शरद पवारसाहेबांच्या उपस्थितीसाठी पुढे ढकललेला हा सोहळा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. साहेब आले नाहीत पण, त्यांची उणीव दादांनी भरून काढली. 

आमदार बरोरा हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहापूरचे आमदार आहेत. पवारसाहेब हे त्यांचे श्रद्धास्थान. साहेबांनी आपल्या मुलांच्या लग्नाला उपस्थित राहिलेच पाहिजे असे त्यांना वाटत होते. अनेक वेळा मागूनही तारीख मिळत नव्हती. त्यासाठी मुहुर्तही पाहिला नाही.

साहेबांनीच तारीख दिली 22 डिसेंबर2018. सायंकाळी साडेसहा वाजता साहेब बरोरा यांचा मुलगा निखिल आणि मुलगी नेहा यांना आशिर्वाद देण्यासाठी येणार होते. पण, अचानक साहेबांना महत्त्वाचे काम निघाल्याने ते येऊ शकले नाहीत. 

या विवाह सोहळ्यासाठी आमदार बरोरा यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण दिले होते. साहेब आले नाहीत पण, अजितदादांबरोबरच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गणेश नाईक, चित्रा वाघ, मधुकर पिचड, शशीकांत शिंदे ही राष्ट्रवादीच्या दिग्गज मंडळीबरोबरच इतर पक्षांचे नेतेही आवर्जुन उपस्थित होते.

यावेळी अजितदादांनी बरोरा यांनी नव दाम्पत्यांना आर्शिवाद दिले. काही अपरिहार्य कारणांमुळे न आल्याने या सोहळ्यावर काहीशी नाराजीची छाया असली तरी जसे जसे मान्यवर येऊ लागले तसे तसे नाराजीची छाया दूर होत गेली.

अजिददादांनी स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या नंतरच दोन्ही लग्न लागली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवराची वधुवरांना आर्शिवाद देण्यासाठीची लगबग सुरू होती. हा लग्न सोहळ्यासाठी दहा हजाराहून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते. शहापूरमध्ये असा विवाह गेल्या काही वर्षात झाला नसल्याची चर्चाही मंडपात सुरू होती. 

आज सकाळी अजित पवार यांनी आमदार बरोरा यांना फोन वरून सोहळा उत्तम आयोजित केल्याबद्दल पाठ थोपटली. असे असले तरी मंडपात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याकडे बघितले जात होते तशी चर्चाच मंडपात सुरू होती.

विशेष पाहुणे म्हणून बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार कपिल पाटील, माजी खासदार सर्वश्री संजीव नाईक, दामू शिंगाडा, बळीराम जाधव, आमदार सर्वश्री दत्ता भरणे, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, सुरेश लाड, किसन कथोरे, आनंद ठाकूर, धैर्यशील पाटील, निरंजन डावखरे, रुपेश म्हात्रे, संजय शिरसाट, शांताराम मोरे, अमित घोडा तसेच माजी आमदार सर्वश्री प्रकाश भोईर, दौलत दरोडा, पांडुरंग गांगड, शिवराम झोले, श्रीरंग शिंगे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, ठाणे, कुणबी सेना नेते विश्वनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील, ज्येष्ठ नेते आर.सी.पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भिमनवर,आयपीएस अधिकारी संदीप कर्णिक, अधीक्षक अभियंता, अंकुर देसाई अधीक्षक अभियंतानाना पवार ,अधीक्षक अभियंता बी.बी.लोहार आदी मान्यवर उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com