baramati sakhar sharad pawar news | Sarkarnama

बारामतीच्या साखरेने हवामान विभागाचे तोंड केले गोड 

sarkarnama
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे ः गेल्या पाच दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरला. यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी (ता.23) बारामतीहून 50 किलो साखर हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अकुंश काकडे यांच्या हस्ते हवामान विभागाचे वैज्ञानिक एफ पी. के नंदनकर यांना ती देण्यात आली. 

या वेळी राष्ट्रवादीचे पुणे महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक सुभाष जगताप, राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, मृणाल ववले, दिलीप बराटे आदी उपस्थित होते. 

काकडे म्हणाले, की वेधशाळेने दिलेला अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असे वक्तव्य यांनी केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच पाऊस पडला. दिलेल्या शब्दाला जागून पवार यांनी बारामतीवरून 50 किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठविली आहे. हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती परदेशातील हवामान विभाग घेत आहे. आगामी काळातही असेच चांगले अचूक अंदाज शेतकऱ्यांसाठी देण्याचे आवाहन त्यांनी हवामान विभागाला केले आहे. 
 
संबंधित लेख