baramati ncp`s selection rights to ajitdada | Sarkarnama

बारामतीतील राष्ट्रवादीचे संघटनात्मक निवडीचे अधिकार अजितदादांना

मिलिंद संगई
रविवार, 4 मार्च 2018

बारामती शहर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडीचे सर्वाधिकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा ठराव आज एकमताने घेण्यात आला.

बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेचे संचालक मदनराव देवकाते यांनी हा ठराव मांडला तर त्याला सुनील पवार यांनी अनुमोदन दिले. 

बारामती शहर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडीचे सर्वाधिकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा ठराव आज एकमताने घेण्यात आला.

बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेचे संचालक मदनराव देवकाते यांनी हा ठराव मांडला तर त्याला सुनील पवार यांनी अनुमोदन दिले. 

दरम्यान राज्य प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचीही एकमताने निवड केली गेली. राष्ट्रवादीच्या सन 2020 पर्यंतच्या अंतर्गत संघटनात्मक निवडीबाबत चर्चा करण्यासाठी आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सर्वांचे स्वागत करून पक्षांतर्गत निवड़णूकी सोबतच सभासद नोंदणी, बुथ कमिटी, कृती आराखडा, ई-कार्यकर्ता या बरोबर 15 मार्चच्या जेष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाची माहिती देत सर्वांनी एकजूटीने पक्ष बळकट करून निष्क्रिय सरकार विरोधात लढा उभा करावा असे आवाहन केले.

शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी शहराचा सविस्तर आढावा देऊन पक्षासाठी सर्वच मान्यवर व तरूण सहकारी यांनी पक्षासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम हे आदर्श कामकाज असून प्रत्येक बाबतीत बारामती तालुका नेतृत्वास अपेक्षित असलेली कामगिरी करत असतो, राज्यात पक्षाची ताकद वाढत असून पवारसाहेब, अजितदादा, व सुप्रियाताई यांनी संपूर्ण राज्यव्यापी दौरा, मोर्चे व हल्लाबोल आंदोलन करीत आहेत. आपण त्यास सर्वांनीच अपेक्षित अशी साथ देऊन सर्वांनी एकजूटीने काम करावे, असे आवाहन पक्ष निरीक्षक राहुल शेवाळे यांनी केले. 

या बैठकीसाठी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर, उपसभापती शारदा खराडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अँड. राजेंद्र काटे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

संबंधित लेख