Baramati-Biraju-Mandhare | Sarkarnama

बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी बिरजू मांढरे

मिलिंद संगई
शनिवार, 3 मार्च 2018

बारामती येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिरजू भाऊसाहेब मांढरे यांची आज बिनविरोध निवड झाली. 

बारामती : येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिरजू भाऊसाहेब मांढरे यांची आज बिनविरोध निवड झाली. 

जय पाटील यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आज या पदासाठी निवडणूक होती. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमेव बिरजू मांढरे यांचा अर्ज आल्यामुळे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, मावळते उपनगराध्यक्ष जय पाटील, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. 

बिरजू मांढरे हे यंदाच्या निवडणूकीत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांना दुसऱयाच वर्षी राष्ट्रवादीने उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व इम्तियाज शिकीलकर यांच्याकडे बिरजू मांढरे यांचे नाव पाठविले व त्या नंतर मांढरे यांनी आपला अर्ज दाखल केला.

आगामी काळात ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत राहू, असे बिरजू मांढरे यांनी निवडीनंतर सांगितले. 

बारामती शहर स्वच्छ, सुंदर व हरित राहावे या साठी नगराध्यक्ष तसेच सहकारी सर्व नगरसेवक व प्रशासनाला सोबत घेऊन आपण काम करु असे ते म्हणाले. 

संबंधित लेख