रासपतून आलेले बापूराव सोलनकर बनले राष्ट्रवादीचे दौंडमधील निरीक्षक

रासपतून आलेले बापूराव सोलनकर बनले राष्ट्रवादीचे दौंडमधील निरीक्षक

बारामती शहर : राष्ट्रीय समाज पक्षातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या बापूराव सोलनकर यांच्यावर राष्ट्रवादीने दौंड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलनकर यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्षातून राष्ट्रवादीत आलेले किशोर मासाळ यांना राष्ट्रवादीने प्रदेश उपाध्यक्षपद दिले तर आता त्यांच्या पाठोपाठ बापूराव सोलनकर यांना दौंड विधानसभेचे निरिक्षकपद देत राहुल कुल यांना एक प्रकारे शह देण्याचाच प्रयत्न केला आहे.

महादेव जानकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मासाळ व सोलनकर यांची ओळख होती, मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जानकर यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून मासाळ व त्या पाठोपाठ सोलनकर यांनीही राष्ट्रवादीची वाट धरली होती. अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतानाच त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता, त्या नुसार जानकरांच्या या दोन्ही समर्थकांना राष्ट्रवादीने महत्वाची जबाबदारी देत, एक प्रकारे राष्ट्रीय समाज पक्षाला प्रतिशह दिल्याचे मानले जात आहे.

दौंडमध्ये राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार म्हणून विजयी झाले होते, मात्र लोकसभा निवडणूकीत कांचन कुल यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविली. आगामी विधानसभा राहुल कुल रासपच्या कपबशी चिन्हावरच लढणार असे जानकर यांनी ठामपणे सांगितले आहे, रासपला शह देण्याच्या उद्देशानेच बापूराव सोलनकर यांना दौंड विधानसभेचे निरिक्षक करण्यात आल्याची आज चर्चा होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com