bapat suggests kakade to speak less | Sarkarnama

बापट शिरोळेंना म्हणाले, काकडेंना सांगा आता तुम्ही कमी बोला, मी जास्त बोलतो! 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे : पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य प्रकाशन अहवालाच्या निमित्ताने राजकीय जुगलबंदी आज पुण्यात चांगलीच रंगली. शिरोळे हा सच्चा कार्यकर्ता आहे. ते कमी बोलतात पण खूप चांगला माणूस आहे, असे खासदार संजय काकडे यांनी भाषणात सांगितले. त्यावर बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी कडी केली.

शिरोळे यांना उद्देशून ते म्हणाले, खासदार शिरोळे, काकडेंना सांगा आता तुम्ही कमी बोला, मी जास्त बोलतो. बापट यांनी केलेल्या या कोटीने सारे सभागृह हास्यात बुडाले. 

पुण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात बापट, शिरोळे व काकडे यांच्या भोवती बातम्या फिरत असतात. कधी काकडे बापटांविषयी बोलतात तर कधी बापट हे काकडे यांच्याविषयी बोलून राजकारणात रंगत आणतात. यात शिरोळे मात्र काहीच न बोलता मौन पाळून असतात.

या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमात या तिघांची भाषणे चांगलीत चर्चेची ठरली. सुरवातीला बोलताना खासदार शिरोळे यांनी आपल्या कामाचा अहवाल सादर केला. त्यानंतर खासदार काकडे यांनी शिरोळे यांचे कौतुक केले. शिरोळे हे पक्षाचे कसे निष्ठावान व सच्च कार्यकर्ते आहेत. याची एक आठवण त्यांनी सांगितली.

काकडे म्हणाले, "" 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुण्याची खासदारकीची उमेदवारी मला देऊ केली होती. मात्र काही कारणास्तव मी ती नाकारली. त्याला खासदार शिरोळेदेखील साक्षीदार आहेत. मुंडे यांनी माझी उमेदवारी निश्चित केल्यानंतर त्यावर नाराज न होता. शिरोळे माझ्या घरी आले. मला म्हणाले, तुम्ही उमेदवार असाल तर मी तुमचा प्रचारप्रमुख म्हणून काम करीन. त्यानंतर शिरोळे यांनाच उमेदारी मिळाली. मात्र त्यांच्यातला पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता मी त्या निमित्ताने अनुभवला. शिरोळे कमी बोलतात त्यामुळे त्यांच्याबाबत लोकांचे गैरसमज होतात. मात्र ते सच्चा, प्रामाणिक माणूस आहे.``

काकडे यांनी आणखी एक राजकीय गुपित या वेळी फोडले. 2014 च्या निवडणुकीतही बापट यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी. यासाठी मी पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी भांडलो. मात्र शिरोळे कधीही नाराज झाले नाहीत.'' 

बापट यांची भाषणाची वेळ येताच त्यांनी शिरोळे यांनी खासदार म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. काकडे यांनी उघड केलेल्य गुपितांबद्दल ते काहीच बोलले नाहीत. उलट शिरोळे यांना त्यांनी सल्ला दिला. "शिरोळे कमी बोलतात, असे आता खासदार काकडे यांनी सांगितले. मात्र यापुढे आता तुम्ही कमी बोला. मी जास्त बोलतो, असे काकडे यांना सांगा, असे शिरोळे यांच्याकडे बघत बापट यांनी चौकार मारला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख