बापटांच्या दबावामुळे अविनाश बागवे यांना अटक : काॅंग्रेसचा आरोप

बापटांच्या दबावामुळे अविनाश बागवे यांना अटक : काॅंग्रेसचा आरोप

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट व भाजपच्या लोकप्रतिनिधींनीच षडयंत्र रचून नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. हे अटकसत्र भाजप पुरस्कृतच होते, असा आरोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मंगळवारी केला. 

कासेवाडीतील अशोक मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ट्रॅक्‍टरचालक व साऊंड सिस्टीम मालकास मारहाण केल्याप्रकरणी बागवे यांच्यासह जयवंत मोहिते, सुरज कांबळे, अरुण गायकवाड, विठ्ठल थोरात (सर्व रा. कासेवाडी) यांना अटक केली होती. तर अन्य दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस भवन येथे रमेश बागवे यांच्यासह मोहन जोशी, अरविंद शिंदे, शरद रणपिसे, कमल व्यवहारे, ऍड.अभय छाजेड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर टीका केली. 

बागवे यांची अटक हा भाजपचा पूर्वनियोजित कट होता. पोलिसांकडे खोट्या केस दाखल करुन कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. त्यांनी पत्रकार, लेखक व विचारवंताना सोडले नाही. आता कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणास जातीय वळण देऊन द्वेषभावना पसरविण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप त्यांनी केला. शहरातील सर्व काॅंग्रेस नेते बागवे यांच्या पाठीशी उभे राहिले.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com