Bapat Gorhe Appointed and Coordinators | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

गिरीश बापट - निलम गोऱ्हे यांची युतीच्या समन्वयकपदी नियुक्ती : पुण्याच्या उमेदवारीबाबतचा बापटांचा दावा मात्र कायम

मंगेश कोळपकर
बुधवार, 13 मार्च 2019

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये समन्वय राखण्यासाठी  पुणे, बारामती, मावळ, शिरूर, सोलापूर, माढा या लोकसभा मतदारसंघांसाठी  शिवसेनेच्या उपनेत्या आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, ही नियुक्ती झाली असली तरी बापट यांचा पुणे लोकसभा उमेदवारीबाबतचा दावा कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये समन्वय राखण्यासाठी  पुणे, बारामती, मावळ, शिरूर, सोलापूर, माढा या लोकसभा मतदारसंघांसाठी  शिवसेनेच्या उपनेत्या आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, ही नियुक्ती झाली असली तरी बापट यांचा पुणे लोकसभा उमेदवारीबाबतचा दावा कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिरूर आणि मावळ मध्ये शिवसेनेचे अनुक्रमे शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे  विद्यमान खासदार आहे तर अन्य चार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात समन्वय राहावा, यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे पुण्यातील त्यांच्या उमेदवारीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. या नियुक्त्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने त्याला तत्वतः मंजुरी दिली असली तरी बापट यांच्या उमेदवारीचा निर्णय अजूनही होऊ शकतो, असे भारतीय जनता पक्षामधील सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख