banubai girigosawi about r r patil | Sarkarnama

आबा माझा धर्माचा भाऊ होता; तो मोठा आहे, हे माझ्या जगण्याचं बळ होतं! 

संपत मोरे 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

काकी, तुमच्यात कोणतरी पाव्हणं आल्याती. मी लगेच उठले. तर पाव्हणा दारात येऊन उभा राहिला. त्या पाव्हण्याला बघून मला काय करावं आणि काय नको हे कळेना. हा पाव्हणा माझ्या घरला कसा काय आला? असा प्रश्न मला पडला. तो पाव्हणा दुसरा तिसरा कोण नव्हता तर माझ्या माहेरचा माझा धर्माचा भाऊ आर आर आबा होता.

मी सोप्यात बसलेले. एक बारका पोरगा पळतच आला. 

काकी, तुमच्यात कोणतरी पाव्हणं आल्याती. मी लगेच उठले. तर पाव्हणा दारात येऊन उभा राहिला. त्या पाव्हण्याला बघून मला काय करावं आणि काय नको हे कळेना. हा पाव्हणा माझ्या घरला कसा काय आला? असा प्रश्न मला पडला. तो पाव्हणा दुसरा तिसरा कोण नव्हता तर माझ्या माहेरचा माझा धर्माचा भाऊ आर आर आबा होता. 

"आबा हिकडं कसं आला?' 

"बनूआक्का, तुला भेटायला आलोय. मी या भागात आलो होतो. तुझ्या गावातून निघालोय. म्हटलं आक्कांची गाठ घेऊन जाऊ. " 

माझ्या माहेरचा हा मोठा माणूस बघिल्यावर मला लै आनंद झाला. मला धन्य झाल्यासारखं वाटलं. थोडा वेळ बसून,चहा पिऊन आबा निघून गेलं. 

आबा जिल्हा परिषदेचे सदस्य होते तेव्हा घडलेला एक प्रसंग कडेगाव तालुक्‍यातील रामापूर गावच्या बनुताई गिरीगोसावी यांनी सांगितला. 

बनुताई सांगतात, 
"त्यानंतर आबा आमदार झाले, मंत्री झाले. मी कधीही माहेरला अंजनीला गेले. आबाच्या घरी गेल्यावर आबा मला विचारायचे, 

"बनूआक्का बरं हाय का तुझं ?" 

आबा एवढा मोठा झाला पण मला विसरला नाही. 

मी आबाला टीव्हीवर बघायचे. मला अभिमान वाटायचा. आबाचा मला आधार वाटायचा. माझा माहेरचा भाऊ एवढा मोठा आहे हेच माझ्या जगण्याच बळ होतं.' 

संबंधित लेख