bansode attacks praniti shinde | Sarkarnama

मुंबईत काय काय घडते ते उघड करायला वेळ लागणार नाही : बनसोडेंचा प्रणिती शिंदेंना इशारा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

पुणे : आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टिकेला सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी सडेतोड उत्तर दिले असून, त्यांनी बालिश वक्तव्ये करू नयेत, अन्यथा गंभीर परिणामाला सामारे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

खासदार बनसोडे हे बेवडा असल्याची टीका शिंदे यांनी केली होती. त्यावर बनसोडे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मी नेहमी महिलांचा आदर करतो. पण त्याचा गैरफायदा घेऊन प्रणिती शिंदे यांनी माझे वैयक्तिक चारित्र्य हनन करू नये त्याच्या या बेताल आणि बालिश वक्तव्यावरून असेच वाटते की त्यांच्यावर घरातून योग्य संस्कार झाले नसावेत.

त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत कधीच कोणावर वैयक्तिक टीका केली नाही पण मुलगी मात्र बालिश आणि बेताल वक्तव्य करून स्वतःचीच संस्कार न झालेली बुद्धी पाजळत आहे. मी बेवडा आहे, हे पहायला त्या माझ्या घरी आल्या होत्या का, ते आधी त्यांनी सांगावे. मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे त्याही जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत पण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बलिशपणाचे वक्तव्य त्यांनी करू नये. अन्यथा मुंबईत काय काय घडते ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही. निवडणूक लढवायची असेल तर आपली कामे सांगून समोरासमोर या. जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचे ते! या पुढील काळात असे वैयक्तिक टीका करू नये अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असे बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख