bansode asks sushilkumar shinde | Sarkarnama

सुशीलकुमार शिंदेंना रेल्वेत अंडी कशासाठी दिली जात होती : खासदार बनसोडे यांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

पुणे : आमदार प्रणिती शिंदे यांनी बेवडा म्हणून टीका केल्याने सोलापूरचे खासदार शरद बनसोडे चिडलेले आहेत. त्यांनीही प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करत त्यांच्या मुंबईतील गोष्टी जाहीर करण्याचे आव्हान दिले. बनसोडे यावरच थांबले नाहीत तर प्रणिती यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांना सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये अंडी कशासाठी दिली जात होती, हे संपूर्ण सोलापूरला माहीत आहे, असा आरोप केला.

सोलापुरातील आपण केलेल्या कामाचे उद्घाटने बेवडे खासदार करतात, असा आरोप करून प्रणिती यांनी खळबळ उडवून दिली. त्याला बनसोडे यांनी जशास तसे उत्तर देऊन हा संघर्ष आणखी तीव्र केला. बनसोडे यांनी पलटवार करणारा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यात शिंदे कुटुंबावर आरोप केले आहेत.

प्रणिती यांच्या मुंबईतील गोष्टी सोलापुरात जाहीर करण्याचे आव्हान दिल्यानंतर बनसोडे यांनी दारू पिणे ही वैयक्तिक बाब असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी रेव्ह पार्टीचा उल्लेख या व्हिडीओत केला आहे. तसेच सुशीलकुमार शिंदे हे मुंबईहून सोलापूरला येताना दादरमध्ये आणि सोलापूरहून मुंबईला जाताना कुर्डुवाडीमध्ये त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये त्यांना अंडी कशासाठी दिली जात होती, हे सोलापूरला माहीत आहे, अशी माहिती उघड केली आहे.

प्रणिती यांनी माझ्या कामावर जरूर टीका करावी. पण त्यांनी वैयक्तिक आरोप करू नयेत, असे आवाहन करतानाच त्या पुढे आमदारही राहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. वडिलांनी जे स्थान मिळवले आहे, त्याला धक्का लावू देऊ नका, अशीही सूचना त्यांनी केली आहे. अन्यथा कठोर कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा त्यांनी दिला.

वाचा आधीच्या बातम्या- मुंबईत काय काय घडते ते उघड करायला वेळ लागणार नाही : बनसोडेंचा प्रणिती शिंदेंना इशारा

प्रणिती शिंदे म्हणतात, सोलापूरचा खासदार बेवडा!

संबंधित लेख