bandatatya karadkar about padma award | Sarkarnama

'डाऊ' घालविणाऱ्या बंडातात्यांनी सरकारला सांगितले, नको मला 'पद्मश्री'! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

बंडातात्यांनी दहा वर्षांपुर्वी डाऊ कंपनीच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले होते. तुकारामांच्या भूमीचे पावित्र्य नष्ट करणारा हा प्रकल्प असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. याप्रकरणात त्यांना कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारने तुरुंगात घातले होते. मात्र त्यांनी हार मानली नाही. हा प्रकल्प त्यांनी परत पाठवला. 
 

कऱ्हाड (सातारा) : वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी धडपडणारे आणि गरजेनुसार रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारे बंडातात्या कऱ्हाडकर यांनी 2019 च्या पद्म पुरस्काराची शिफारस नाकारली आहे. 

राज्य शासानकडून केंद्राला पद्म पुरस्कारासाठी बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. त्याबाबत सामान्य प्रशासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव सतीश जोंधळे यांनी त्याबाबतचे शिफारस पत्र कऱ्हाडकर यांना पाठवले आहे. पुण्याच्या मातृभूमी दक्षता चळवळीचे राष्ट्रीय समन्वयक मुबारक शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कऱ्हाडकर यांना पद्म पुरस्कार द्यावा, अशी शिफारस केली आहे. त्याची दखल घेवून राज्य शासनाने केंद्राला 2019 मध्ये देण्यात येणाऱ्या पद्म पुरसकारासाठी शिफारस करण्यासाठी कऱ्हाडकर यांची माहिती मागवली आहे. ती माहिती देण्यास कराडकर यांनी नकार देतानाच शासनाचा कोणताही पुरस्कार मला नको असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 
 

संबंधित लेख