band maratha morcha | Sarkarnama

नगर जिल्ह्यात कडकडीत बंद, सर्व महामार्गावर चक्का जाम

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नगर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शहर व जिल्ह्यातील सर्व महामार्ग अडविण्यात आले. शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रास्ता रोको सुरू झाला. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातील प्रमुख चौकांत रास्ता रोको करून महामार्ग रोखण्यात आले आहेत. 

नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकाजवळील रास्ता रोकोत शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम सहभागी झाल्या. सकल मराठा समाजातील कार्यकर्ते संभाजी दहातोंडे, संजीव भोर, गोरख दळवी, बाळासाहेब पवार, सोमनाथ रोकडे आदींनी नियोजन करीत मोर्चास सुरूवात झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ करताना शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. काही मोर्चेकरी बैलगाडीतून आले होते. 

महिला व लहान मुलांचा सहभाग 
मोर्चामध्ये महिलांचाही सहभाग मोठा आहे. तसेच लहान मुलांच्याही हाती झेंडे देवून सहभागी करून घेण्यात आले आहे. मोर्चा शांततेत व्हावा, यासाठी विशेष काळजी घेतली जात होती. 
ड्रोन वॉच व पोलिसांचा फौजफाटा 
जिल्ह्यात होणाऱ्या चक्का जाम आंदोलनावर नजर ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ड्रोन कॅमेरे लावले आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून फोटो घेतले जात आहेत. तसेच चित्रिकरणही केले जात आहे. जिल्ह्यात तीन हजार पोलिस बंदोबस्तास ठेवण्यात आले असून, दीडशे अधिकारी, मुख्यालयातील दोन हजार पोलिस, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, नऊशे होमगार्ड, राज्य राखीव दलाचे पथक, दंगल नियंत्रक पथक, शीघ्र कृती दल असा फौजफाटा तयार करण्यात आला असल्याने प्रत्येक रास्ता रोकोच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त दिसून येत आहे. 
 
संबंधित लेख