balgaum ex meyor sarita patil criticise chandrakant patil | Sarkarnama

चंद्रकांत पाटील 'उदासीन मंत्री', आम्हाला उद्धव ठाकरे यांचा आधार वाटतो! 

संपत मोरे
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

अशा नेतृत्वाबाबत आम्हाला बिलकुल आधार वाटत नाही

पुणे: "चंद्रकांत पाटील सिमाप्रश्नाबाबत उदासीन आहेत, ते मंत्री झाल्यापासून एकदाही बेळगावला आलेले नाहीत. अशा नेतृत्वाबाबत आम्हाला बिलकुल आधार वाटत नाही, " अशी टिका बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांनी केली.

बेळगावला उद्या मराठी भाषकांच्या वतीने 'काळा दिन' साजरा केला जाणार आहे. त्या पाश्वभूमीवर सरिता पाटील यांनी चंद्रकांतदादांवर यांच्यावर टिका केली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस आमच्याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

"चंद्रकांत पाटील सिमाप्रश्नाचे समन्वयमंत्री आहेत, पण ते आजवर एकदाही बेळगावला आले नाहीत किंवा या विषयवार त्यानी बेळगावात मिटिंग घेतलेली नाही. त्यांनाच भेटायला कोल्हापूरला जावे लागते. त्यांचा आम्हाला आधार वाटत नाही जेवढा उद्धव ठाकरे यांचा वाटतो. सीमाप्रश्नाबाबत पाटील उदासीन आहेत. आम्ही इथं कन्नड संघटनांशी लढतोय आम्हाला साथ मिळाली पाहिजे मात्र मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.आम्हाला आधार द्यावा,"असे त्या म्हणाल्या.
 

संबंधित लेख