Balasaheb Thorat On Pansare | Sarkarnama

दाभोलकर -पानसरे हत्या प्रकरणातील सूत्रधाराच्या शोध घ्या : बाळासाहेब थोरात 

विकास वाव्हळ
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

डॉ.नरेंद्र दाभोळकर कॉ.गोविंद पानसरे यांच्या सारख्या समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन, त्याच्यावर कारवाई करावी.

-बाळासाहेब थोरात

संगमनेर  : "देशात व राज्यात विचारवंतांवर हल्ले वाढले आहे. त्यामुळे विचार संपणार नाहीत. या हल्ल्याची दखल घेतली जात नाही. ही झुंडशाही थांबविण्यासाठी उपाय योजना करण्याचे सुप्रीम कोर्टाने शासनाला आदेश दिले आहे. डॉ.नरेंद्र दाभोळकर कॉ.गोविंद पानसरे यांच्या सारख्या समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन, त्याच्यावर कारवाई करावी," अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. 

शहरातुन प्रभात फेरी काढुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ डॉ.दाभोळकर व कॉ.पानसरे यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई बाबत 'जबाब दो 'आंदोलन प्रसंगी आमदार थोरात बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अनिसच्या ऍङ रंजना गवांदे, हिरालाल पगडाल, अब्दुला चौधरी, संग्राम जोंधळे,ऍङ ज्योती मालपाणी, अनुराधा आहेर, प्रा.बाबा खरात,अशोक गवांदे, अरविंद गाडेकर आदी उपस्थित होते. 

आमदार थोरात म्हणाले, "स्वामी अग्निवेश सारख्या ज्येष्ठ व्यक्तीवर दिल्ली व हरयाना या ठिकाणी हल्ले होत आहे. डॉ.दाभोळकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येला अनेक वर्ष लोटले आहे. असुन मुख्य सुत्रधारवर अद्याप कारवाई होत नाही. "
आमदार डॉ. तांबे म्हणाले," देशात वेगवेगळ्या कारणाने विचारवंतांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व शक्तीचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवुन काम करणे गरजे आहे."

ऍङ गवांदे म्हणाल्या," प्रत्येक व्यक्तीच्या जिवीतेचे व मालमतेचे रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. परंतु आज देशात विचारवंतांचे खुन होत आहेत.त्याचा तपास पाच-पाच वर्ष लागत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे."

यावेळी नगराध्यक्षा तांबे, हिरालाल पगडाल, अब्दुला चौधरी, संग्राम जोंधळे आदींची भाषणे झाले. यावेळी मोठ्या संस्थेने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संबंधित लेख