राधाकृष्ण विखे पाटील हे तर पक्षविरोधी नेते!  

सभागृहात भाषण संपल्यानंतर प्रत्येक वेळी हे मुख्यमंत्र्यांच्याच दालनात सापडायचे.
राधाकृष्ण विखे पाटील हे तर पक्षविरोधी नेते!  

संगमनेर (जि. नगर) : "राधाकृष्ण विखे पाटील कसले विरोधी पक्षनेते? हे तर कॉंग्रेसमधीलच पक्षविरोधी नेते आहेत. सभागृहात भाषण संपल्यानंतर प्रत्येक वेळी हे मुख्यमंत्र्यांच्याच दालनात सापडायचे. आता ते पक्षाला ताकद दाखविण्याची भाषा करतात. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करूच शकत नाही,'' अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज केली. 

विखे यांना धडा शिकविण्यासाठी कॉंग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. 

कॉंग्रेसचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी निझर्णेश्‍वर (ता. संगमनेर) येथे आयोजित प्रचारसभेत थोरात बोलत होते. आमदार भाऊसाहेब कांबळे, डॉ. सुधीर तांबे व वैभव पिचड, आशुतोष काळे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व माजी आमदार या वेळी उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, "देशातील मोदी लाट कधीच ओसरली आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, नोटाबंदी, जीएसटी आदी कोणत्याच मुद्द्यावर त्यांच्याकडे आता बोलायला काहीच शिल्लक नाही. दिलेली सर्वच आश्‍वासने पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे आता सैनिकांच्या नावावर मते मागण्याचा दुष्टपणा त्यांच्याकडून सुरू आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com