आजचा वाढदिवस : बाळासाहेब थोरात, आमदार, संगमनेर (कॉंग्रेस) 

कार्यकर्ते घडविणे, त्यांचा आदर करणे, क्षमतेनुसार त्यांना योग्य ती जबाबदारी देणे, हेच आमदार बाळासाहेब थोरातयांच्या राजकारणातील यशाचे गमक आहे.
आजचा वाढदिवस : बाळासाहेब थोरात, आमदार, संगमनेर (कॉंग्रेस) 

संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सलग सात वेळा विधानसभेचे सदस्यत्व मिळविले. पाटबंधारे राज्यमंत्री, कृषी व महसूलमंत्रीपद सांभाळले. याबरोबरच राज्य विडी कामगार वेतन समितीचे अध्यक्षपद, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लि.चे संचालक, ऑल इंडिया डिस्टिलरी असोसिएशनचे संचालक, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तसेच उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम करून दाखविले. 

1985 मध्ये पहिल्यांदा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून थोरात निवडून आले. त्यानंतर आतापर्यंत सलग सात वेळा निवडून येण्याची त्यांची हॅटट्रिक आहे. संगमनेर तालुक्‍यात भाऊसाहेब थोरात यांनी आणलेल्या विकासगंगेत बाळासाहेब थोरात यांनी भरच घातली. अमृतवाहिनी सहकारी दूध उत्पादक संस्था, शासकीय दुग्धशाळा, संगमनेर तालुका सहकारी सूत गिरणी, मथुराबाई भाऊसाहेब थोरात दंत महाविद्यालय स्थापन करून परिसरातील ग्रामस्थांचा आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचावला. 

आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच राज्याच्या व देशाच्या राजकारणातही थोरात यांचे वरचे स्थान आहे. मागील वर्षभरात कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ते पक्षातील राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. गुजरात विधानसभा सदस्य निवडीसाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावल्याने पक्षांतर्गत त्यांचे स्थान उंचावले. आता हिमाचल प्रदेशच्या निरीक्षकपदी कॉंग्रेसने थोरात यांची निवड केली आहे. 

कार्यकर्ते घडविणे, त्यांचा आदर करणे, क्षमतेनुसार त्यांना योग्य ती जबाबदारी देणे, हेच थोरात यांच्या राजकारणातील यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com