balasaheb thorat about nagar loksabha seat | Sarkarnama

नगर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी सर्व प्रयत्न: बाळासाहेब थोरात

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कुणीही संभ्रम ठेवू नये.

नगर : नगर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, अशी माहिती आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिका निवडणुकीत आघाडीचा प्रचार हायटेक नसला, तरी उमेदवार घराघरात जावून प्रचार करीत आहेत. एकत्र आलेले सर्व पक्ष चांगला प्रचार करीत आहेत. सर्व एकदिलाने प्रचार करीत आहेत. कुणीही संभ्रम ठेवू नये. महापालिकेच्या प्रचाराची धुरा सुजय विखे यांच्याकडे आहे. त्यांना सत्यजीत तांबे मदत करीत आहेत. आघाडीचा कोणताही जाहिरनामा नसून, वचननामा आम्ही प्रसिद्ध केला आहे. जाहिरनामा नंतर केराच्या टोपलीत जातो. आम्ही दिलेले वचन पाळतो. शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे थोरात म्हणाले.

नगरच्या नागरिकांचा कामांवर विश्वास आहे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कामे केली नसल्याने लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे महापालिकेत आघाडीचीच सत्ता येणार आहे. यात शंका नाही. आघाडीने दिलेले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रचार करीत असल्याने लोकांचाही आमच्यावर विश्वास आहे, असे थोरात म्हणाले. 

संबंधित लेख