balasaheb thorat | Sarkarnama

बाळासाहेब थोरातांचा डबल गेम  दूध विक्री बंदोबस्तात सुरू 

संदीप खांडगेपाटील 
रविवार, 4 जून 2017

मुंबई : कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या राजहंसचे दुध पोलिस बंदोबस्तात मुंबईला विक्रीकडे जात असल्याने नगरमधील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी संपाबाबत ते डबल गेम करीत आहे. 

मुंबई : कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या राजहंसचे दुध पोलिस बंदोबस्तात मुंबईला विक्रीकडे जात असल्याने नगरमधील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी संपाबाबत ते डबल गेम करीत आहे. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला राज्यातील अनेक शेतकरी संघटनांचा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्षांचा तसेच राजकीय पुढाऱ्यांचाही पाठिंबा आहे. शेतकऱ्यांनी संप पुकारण्यापूर्वी बाळासाहेब थोरातांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेवून आपणही संपात शेतकऱ्यांसोबत असल्याचे चित्र नगर जिल्ह्यात उभे केले होते. 
शेतकरी संपावर गेल्यापासून राज्यातील अनेक भागात दूधाचे टॅंकर रस्त्यावर जागोजागी ओतून दिले जात आहे. मात्र बाळासाहेब थोरातांशी संलग्न असलेल्या राजहंसचे डेअरीचे दुध गेल्या चार दिवसापासून पोलिस बंदोबस्तात मुंबईला विक्रीला जात असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे नगरमधील शेतकऱ्यांमध्ये थोरातांप्रती नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

तीन दिवस रात्रीच्या अंधारात राजहंसचे दुध मुंबईला विक्रीला पाठविण्यात येत होते. परंतु रविवारी दिवसाउजेडी पोलिस बंदोबस्तात राजहंसा दुधाचे 7 टॅकर विक्रीसाठी पाठविण्यात आले. ही बाब नगरच्या शेतकऱ्यांना समजताच थोरातांप्रती सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये चीड व्यक्त केली जात आहे.  

संबंधित लेख