Balasaheb Thakrey was a leader of masses | Sarkarnama

बाळासाहेब हे चार भिंतीतील व्यक्तीमत्त्व नव्हतं : उद्धव ठाकरे 

सरकारनामा
शनिवार, 12 जानेवारी 2019

ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : " बाळासाहेब ठाकरे  हे व्यक्तीमत्त्व हे चार भिंतीमधलं नव्हतं . त्यामुळे प्रतिसाद ऐकायचा असेल तर मैदानात उतरावं लागेल," असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले . 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या चित्रपटाचा म्युझिक अल्बम लॉंच सोहळा  वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलात  पार पडला . त्यावेळी बाळासाहेबांबद्दल दोन शब्द बोलण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मंचावर आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला. 

आवाज नीट ऐकू येत नसल्याचे काही श्रोते  म्हणाल्यानंतर  उद्धव ठाकरे म्हणाले की ," शिवसैनिकांचा एवढा  जल्लोष इथे ऐकायला मिळेल.  जर तुम्हाला त्यांचा प्रतिसाद ऐकायचा असेल तर मैदानात उतरावे लागेल. बाळासाहेब हे चार भिंतीतील व्यक्तीमत्त्व नव्हतं ते मैदानातलं होतं. त्यामुळे तो आवाज जर ऐकायचा असेल तर मैदानात आलं पाहिजे, मैदानात उतरलं पाहिजे."

ठाकरे चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यावेळी या चित्रपटातील 4 गाणी प्रदर्शित करण्यात आली. अवधूत गुप्ते, रोहन- रोहन, नकश अझीज यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत तर रोहन- रोहनने या चित्रपटाचे संगीत दिले आहे. ठाकरे चित्रपटातील 'आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे...' हे  गाणं आजच्या दिमाखदार सोहळ्यात सादर  करण्यात आलं. 

 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , आदित्य ठाकरे ,चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत  , चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे नवाजुद्दीन सिद्दीकी, मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अमृता राव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख