बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले,  दारातील खेटरं सांभाळा,सगळं मिळेल : रामभाऊ उबाळे  

खरी संपत्ती दाराबाहेरील खेटरांत (माणसं तथा कार्यकर्ते) आहे. ती सांभाळा.तीच खरी व मोठी संपत्ती आहे. कार्यकर्ते सांभाळले तर सर्व काही मिळेल.
Thakre & Ubale couple
Thakre & Ubale couple

पिंपरीःआपल्या नेत्याकडे त्यांचा पदाधिकारी वा कार्यकर्ता गेला,तर आशीर्वाद काय मिळतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे.मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा असा आशीर्वाद म्हणजे त्यांच्या स्वभावाचा उत्तम नमुना आहे. "दारातील खेटरं सांभाळा,सगळं मिळेल '', असा आशीर्वाद त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेनेच्या  नवनियुक्त विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे  आणि त्यांच्या पतींना दिला 1998 मध्ये दिला होता. 

शिवसैनिक हीच आपली खरी व मोठी संपत्ती असून त्यालाच आपले सर्वाधिक महत्त्व असल्याची वीस वर्षापूर्वीची बाळासाहेबांची ही आठवण व शिकवण पक्षाच्या या महिला पदाधिकारी (सध्या पुणे जिल्हा महिला संघटिका)सुलभा उबाळे  व त्यांचे पती आणि विद्यार्थी सेनेचे माजी पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख रामभाऊ उबाळे यांनी अजून सांभाळलेली आहे.

 रामभाऊ उबाळे यांनी बाळासाहेबांची 1998 ची ह्रद्य आठवण सांगितली. ते त्यावेळी विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख होते. तर,त्यांच्या पत्नी सुलभा या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. त्या विरोधी पक्षनेत्या झाल्या. त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी उभयता मुंबईला 'मातोश्री'वर गेले. 

त्यावेळी बाळासाहेब रामभाऊंना म्हणाले, " राम, तुमच्या पत्नी श्रीमंत पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या झाल्या आहेत. मात्र, खरी संपत्ती दाराबाहेरील खेटरांत (माणसं तथा कार्यकर्ते) आहे. ती सांभाळा.शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांचा राबता जेवढा तुझ्या घरी राहील तेवढी दाराबाहेरील खेटरे वाढतील .   तीच खरी व मोठी संपत्ती आहे. कार्यकर्ते सांभाळले तर सर्व काही मिळेल.'' हा वसा आम्ही दोघांनी अद्याप सांभाळलेला आहे. अजूनही 'मातोश्री'त "दारातली खेटरं सांभाळा, तीच खरी संपत्ती आहे''अशी ओळ असलेली छोटी पाटी आहे, असे रामभाऊ म्हणाले.

बाळासाहेब शब्दाचे पक्के होते. एकदा शब्द दिला, की तो ते कसल्याही स्थितीत पाळत होते. त्याचा प्रत्यय देणारी आठवण रामभाऊंनी सांगितली.2009 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील भोसरीची शिवसेनेची उमेदवारी सुलभा उबाळे यांना मिळाली होती. त्यावेळी शहरातील बहुतांश पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला.

ते बाळासाहेबांकडे गेले. म्हणाले "आपले डिपॉझिट जाईल''. त्यावर "आता मी निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिपॉझिट गेले,तरी चालेल''असे बाळासाहेब म्हणाले होते. उबाळे यांचा अवघा 1272 मतांनी पराभव झाला. त्यानंतर बाळासाहेबांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात सुलभा उबाळे यांनी दिलेल्या जोरदार झुंजीचे त्यावेळच्या शहरप्रमुखांसमोर कौतुक केले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com