balasaheb smaratk stamp duty | Sarkarnama

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठीच्या भूखंड भाडेकराराचे नोंदणी व मुद्रांक शुल्क माफ 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्मारक संस्थेला या जागेचे भाडेपट्याने हस्तांतरणासाठी द्यावे लागणारे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी नोंदणी अधनियिम-1860 नुसार बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेला स्मारकाच्या उभारणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालकिेकडून महापौर बंगल्याची जागा 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे.

त्यानुसार होणाऱ्या भाडेकराराच्या दस्तासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधनियिमानुसार 14 कोटी 41 लाख 61 हजार 50 रुपये इतके मुद्रांक शुल्क तर नोंदणी अधनियिम-1908 नुसार 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. 

या प्रकल्पाचे महत्त्व आणल्लिोकहित लक्षात घेऊन भाडेकराराच्या दस्ताचे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात आली. 
 
संबंधित लेख