लोकसभेच्या बक्कळ मताधिक्याने पूर्व मतदारसंघात भाजप शहराध्यक्ष आमदार सानपांची वाढली डोकेदुखी

लोकसभेच्या बक्कळ मताधिक्याने पूर्व मतदारसंघात भाजप शहराध्यक्ष आमदार सानपांची वाढली डोकेदुखी

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या नाशिक पूर्व मतदारसंघात विरोधकांकडून आघाडीचे डावपेच सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत येथे युतीला ७६ हजाराचे बक्कळ मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपमध्ये अनेक इच्छुक तयार झाले आहेत. त्यांनी थेट शहराध्यक्षांनाच उमेदवारीसाठी आव्हान दिल्याने आमदार सानप यांना उमेदवारीसाठी निवडणुकीत विरोधकांआधी स्वपक्षातील इच्छुकांशी झगडावे लागणार आहे.

गेली पाच वर्षे शहराध्यक्ष असललेल्या आमदार बाळासाहेब सानप यांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी सख्य असल्याने शहराच्या राजकारणावर चांगली पकड होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे संबंध अलबेल नसल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे समीर भुजबळ यांच्या ४०,८५७ मृतांच्या तुलनेत युतीचे खासदार हेमंत गोडसेंना १,१७,१२७ मते मिळाली. ७६ हजारांच्या बक्कळ मताधिक्याने युतीसाठी मतदारसंघ सुरक्षित झाला. मात्र, विद्यमान आमदारांपुढे नवे आव्हान उभे राहिले. महाजन- सानप यांच्यातील दुरावा आणि मंत्री गिरीश महाजन यांचे पक्षातील स्थान बळकट झाल्याने पक्षात त्यांची दहशत वाढली. त्यामुळे शहराध्यक्ष आमदार सानप यांची उमेदवारी रिपीट होणार काय अशी चर्चा सुरू आहे. 

भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेश पदाधिकारी सुनिल बागूल, सलग चार टर्म नगरसेवक असलेले अरूण पवार हे प्रबळ दावेदार आहेत. नगरसेवक उध्दव निमसे, सुनिल केदार, सुनिल आडके यांनीही नेत्यांकडे उमेदवारी मागीतली आहे. एकाच वेळी पाच इच्छुक उमेदवार असल्याने पक्षात जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. यातील प्रमुख इच्छुकांनी "मतदारसंघ खुल्या प्रवर्गातील आहे. त्यामुळे उमेदवार देखील त्याच गटातील असावा, या तर्कामुळे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना नवी डोकेदुखी निर्माण झाल्याचे चित्र आहे.  विरोधातील उमेदवारांआधी आमदार सानप यांना स्वपक्षातील स्पर्धकांशी  संघर्ष करावा लागेल. हा संघर्ष अधिक निकराचा असेल.

या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भाजपला मोठ्या प्रमाणात अनुकूल वातावरण आहे. ब्राह्मण, गुजराती पटेल, इतर मागासवर्गीय मतदारसंख्या मोठी आहे. पंचवटी व नाशिक रोड प्रभागात ८० टक्के नगरसेवक युतीचे आहेत. पक्षाची संघटनात्मक यंत्रणा सक्रीय आहे. त्यामुळे सध्या पाच इच्छुक आहेतच मात्र शिवसेना देखील मतदारसंघात दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या मताधिक्याने निवडणूक सोपी असली तरी पक्षांतर्गत इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com