balasaheb patil kokan bhada chairman | Sarkarnama

बाळासाहेब पाटील भाजपकडून कोकण-म्हाडाचे सभापती 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

कऱ्हाड : इंदोली (ता.कऱ्हाड) गावचे सुपुत्र बाळासाहेब ज्ञानदेव पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री दर्जा असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाच्या (कोकण म्हाडा) सभापतीपदी निवड केली आहे. त्यामुळे साताऱ्यातील चौथ्या नेत्याला भाजपने महामंडळावर संधी दिली आहे. 

भाजप व शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या महामंडळांपैकी सातारा जिल्ह्यातील चौघांना यामध्ये संधी मिळाली आहे. यामध्ये भाजपकडून तिघांना तर शिवसेनेकडून एकास महामंडळ मिळाले आहे. यामध्ये भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील (पाटण), सदाशिव खाडे (एनकुळ, ता. खटाव), तसेच बाळासाहेब पाटील (इंदोली, ता. कऱ्हाड) तर शिवसेनेकडून सातारा-सांगली संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील (कोरेगाव) यांचा समावेश आहे. 

यामध्ये इंदोलीचे पाटील हे 35 वर्षांपासून भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत. कार्यकर्ता ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास झाला आहे. व्यवसायाच्या निमीत्ताने ते पनवेल येथे स्थायिक आहेत. तेथून त्यांनी पक्षाच्या कामाची सुरुवात केली. पूर्वी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून 15 वर्षे काम करुन तेथे भाजपचे कमळ फुलवण्याचे काम केले आहे. 

त्यांनी माजी केंद्रीय मंत्री (कै) गोपीनाथ मुंढे आणि (कै) प्रमोद महाजन यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांना कोकण म्हाडाच्या सभापती पदाची जबाबदारी दिली आहे. श्री. पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सत्कार केला. 

संबंधित लेख