Balasaheb Ambedkar criticises BJP | Sarkarnama

भाजपच्या करवाढीविरुद्ध बाळासाहेब आंबेडकरांचा एल्गार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जून 2017

अकोलेकरांना "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित महापालिकेतील सत्तेवर आलेल्या भाजपने करवाढ करून अकोलेकरांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. या करवाढीविरोधात भारतीय बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी तीव्र विरोध करीत आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. 28 जून रोजी स्वतः बाळासाहेब महापालिकेवर मोर्चा काढून जुनाच कर भरणार असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. 

अकोला : अकोलेकरांना "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित महापालिकेतील सत्तेवर आलेल्या भाजपने करवाढ करून अकोलेकरांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. या करवाढीविरोधात भारतीय बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी तीव्र विरोध करीत आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. 28 जून रोजी स्वतः बाळासाहेब महापालिकेवर मोर्चा काढून जुनाच कर भरणार असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. 

अकोला महापालिका प्रशासनाने नुकत्याच मालमत्ताधारकांना वाढीव कराच्या नोटीस बजावल्या आहेत. मात्र, ही करवाढ अन्यायकारक असून त्याला भारिप-बमसंने तीव्र विरोध केला आहे. महापालिकेच्या तीन एप्रिल 2017 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक पाच मध्ये 2017-18 ते 2021-22 या कालवधीकरिता मनपा क्षेत्रातील संपूर्ण मालमत्ताचे सुधारीत दराने व निकषाव्दारा करमूल्यांकन करण्याचा विषय होता. या विषयावर सभागृहात कोणत्याही प्रकारचे दरपत्रकावर चर्चा न होता सत्ताधारी भाजपने विषय मंजूर केला. या सभेतील इतीवृत्त व ठरावात तफावत असल्याचे म्हणत महापालिकेतील भारिप-बमसंच्या गटनेत्या डॉ. धनश्री अभ्यंकर, नगरसेवक बबलू जगताप आदी नगरसेवकांनी करवाढीला विरोध केला. 

अकोलेकरांवर लादलेल्या या करवाढीचे प्रकरण बाळासाहेब आंबेडकरांकडे गेल्यावर त्यांनी जुनाच कर भरण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यानुसार 28 जून रोजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात शास्त्री स्टेडीयम येथून हजारो नागरिकांचा मोर्चा काढून मागील वित्तीय कर प्रणालीनुसारच कराचा भरणा महापालिका प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे गटनेत्या धनश्री अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी नगरसेवक गजानन गवई, बुद्धरत्न इंगोले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, प्रा. प्रसन्नजीत गवई, आसीफभाई यांच्यासह भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

ही अकोलेकरांची फसवणुकच 
जनतेला "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपकडून वाढीव कर लादून अकोलेकरांची फसवणूक केली आहे. करवाढ रद्द केल्याशिवाय भारिप बमसं शांत बसणार नसून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे भारिप-बमसंच्या गटनेत्या डॉ. धनश्री अभ्यंकर यांनी सांगितले. 

संबंधित लेख