bala nandgaonkar | Sarkarnama

"गोपनीय बातम्या फोडल्यास कारवाई'

सुचिता रहाटे : सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची राजगड येथील मनसे कार्यालयात बैठक पार पडली. मीडियाकडे पक्ष बैठकीच्या व बैठकीतल्या गोपनीय बातम्या पोचतातच कशा? पक्षातील कुणी या बातम्या बाहेर देत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल तसेच त्या व्यक्तीला पदावरून काढून टाकले जाईल. असा ठराव मनसेच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला. 

महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आतापासूनच जोमाने तयारीला लागले आहेत. याच भूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चिंतन बैठक पार्श्वभूमीवर घेण्याचे ठरविले परंतु या बैठकांना चिंतेच स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळते. बैठकीनंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. अशावेळी मनसेचे पदाधिकारी सोशल मीडिया वर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे मेळावे घेणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. 

व्यथा मांडण्याचा अधिकार 
"नेते-सरचिटणीस बदलण्याचा अधिकार राज ठाकरे यांचा आहे. कार्यकर्त्यांना व्यथा मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती व्यथा मांडली तर काहीच चुकीचे नाही. मात्र कोण योग्य, अयोग्य याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील." असेही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.  

संबंधित लेख