bajoriya and cm | Sarkarnama

गाडी थांबवित मुख्यमंत्र्यांनी घेतली आमदार बाजोरियांची भेट...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 डिसेंबर 2018

अकोला : रिलायन्स कंपनीच्या कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या उद्‌घाटनासाठी अकोल्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात शिवनी विमानतळावर शिवसैनिकांच्या प्रवेशावरून शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. हा वाद मुख्यमंत्र्यांना समजल्यावर त्यांनी वाहन थांबवून आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची भेट घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी (ता.3) पश्‍चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आले. अकोल्यात कोकीळाबेन धीरूभाई अंबानी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्‌घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे येणार असल्याने शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह महापालिकेतील सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, तरूण बगेरे, संतोष अनासाने, युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, योगेश बुंदेले, नितीन मिश्रा, दिपक धोत्रे, राहुल कराळे, शशी चोपडे, विजय मालोकार, पप्पू तिडके, ज्योत्स्ना चोरे, देवश्री ठाकरे, रूपेश ढोरे, गजानन चव्हाण यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी विमानतळावर ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोचले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यावर पोलिसांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विमानतळावर प्रवेशास मज्जाव केला. 

आमदार बाजोरिया यांच्यासह दोनच पदाधिकाऱ्यांना आत सोडण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना पासेस नसताना आत जाऊ दिल्या जात असून सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अडवणुक केल्या जात असल्याचा आरोप आमदार बाजोरिया यांनी केला. शिवसैनिकांना प्रवेश नाकारत असला तर मी सुद्धा विमानतळावर जाणार नाही, अशी भुमिका आमदार बाजोरिया यांनी घेतली. त्यामुळे सेनेचे पदाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी शाब्दीक वाद झाल्याने वातावरण चांगलेच तापले. या वादाची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक राजेश कलासागर यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन झाले. विमानतळावर घडलेला प्रकार समजल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी वाहन थांबवित खाली उतरूण आमदार बाजोरिया यांची भेट घेतली. 
 
संबंधित लेख