बाबाजानी आणि बाजोरिया यांच्यात कोपरखळ्या देत रंगला सुखसंवाद

बाबाजानी आणि बाजोरिया यांच्यात कोपरखळ्या देत रंगला सुखसंवाद

परभणी : " प्यार से बोलोगे तो जान भी हाजीर है...भगाने का बोलोगे तो हम भी माहिर है....!' हे वाक्‍य आहे अकोल्याचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे...! आमदार गोपीकिशन बाजोरिया हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानासाठी सोमवारी पाथरी येथील मतदान केंद्रावर आले होते. या वेळी आमदार बाजोरिया व आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील संवाद हास्यकल्लोळ निर्माण करणारा ठरला. 

परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) मतदान झाले. सकाळी साडेबारा वाजता आमदार गोपीकिशन बाजोरिया, उमेदवार विप्लव बाजोरिया हे कार्यकर्त्यांसह पाथरी तहसील कार्यालयात आले होते. यावेळी उन्हापासून बचाव करण्यासाठी उभारण्यात आलेल्या एका शामियानात ते थांबले होते. आमदार बाबाजानी दुर्राणी तेथे आले. 

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार घातला, मग सुरु झाल्या मनमोकळ्या गप्पा...आमदार बाबाजानी दुर्राणी हे गोपिकिशन बाजोरियांना यांना म्हणाले, " मै मैदान मे होना चाहिये था, फिर देखो कैसे भगाता था आपको...! ' यामुळे तेथे उपस्थित नेते व कार्यकर्त्यामध्ये हास्यकल्लोळ पसरला. गोपिकिशन बाजोरिया देखील हजरजबाबी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी तत्काळ याला उत्तर दिले. " प्यार से बोलोगे तो जान भी हाजीर है... भगाने का बोलोगे तो हम भी माहिर है....!' आमदार बाजोरियांच्या या हजरजबाबीपणामुळे या ठिकाणी पुन्हा हास्यकल्लोळ जास्तच पसरला. निवडणुकीचा ताण विसरून सर्वच मनमोकळ्या गप्पात रमले. 15 ते 20 मिनिट गप्पा रंगल्यानंतर आमदार बाबाजानी हे आमदार बाजोरिया यांची रजा घेत निघाले तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासही विसरले नाहीत. या वेळी उमेदवार विप्लव बाजोरिया, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, चक्रधर उगले आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com