bajar samiti in state | Sarkarnama

बाजार समिती कर्मचाऱ्याचे होणार भले !

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 22 जून 2017

राज्यात तालुकास्तरीय बाजार समित्या व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या सुसूत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना लवकरच राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.

मुंबई : एकीकडे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांमध्ये खदखदणारा असंतोष व दुसरीकडे सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्रेक या दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या भाजप सरकारने राज्यातील बाजार समिती कर्मचाऱ्यांचे भले करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचारी व अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या थेट सेवेत सामावून घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी समितीही नेमली आहे. 

राज्यात तालुकास्तरीय बाजार समित्या व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या सुसूत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना लवकरच राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने अभ्यास समितीची नियुक्ती केली असून ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतरच बाजार समिती कर्मचारी व अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य कृषी पणनचे कार्यकारी संचालक सुनिल पवार हे अभ्यास समितीचे अध्यक्ष असून राज्याचे साखर प्रशासनचे संचालक किशोर तोष्णिवाल, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप डेंबरे, पुणे विभागातील कर्मचारी प्रतिनिधी अरविंद जगताप, मराठवाडा विभाग कर्मचारी प्रतिनिधी बालाजी भोसीवार, विदर्भ विभागातील कर्मचारी प्रतिनिधी अकुंश झंझाळ, मुंबई सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत सोनवणे हे या अभ्यास समितीचे सदस्य सचिव आहेत. 
 

संबंधित लेख