bahujan aaghadi and ambedkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

वंचित बहुजन आघाडीचे 26 ला पुण्यात अधिवेशन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

अकोला : वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आता पुण्याकडे वळला आहे. राज्यभर अकरा अधिवेशनाचे नियोजन असून, त्यातील पहिली दोन अधिवेशने सोलापूर आणि औरंगाबाद इथे झाली. आता 26 नोव्हेंबरला पुण्यात तिसरे अधिवेशन आयोजित केले गेले आहे. 

अकोला : वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आता पुण्याकडे वळला आहे. राज्यभर अकरा अधिवेशनाचे नियोजन असून, त्यातील पहिली दोन अधिवेशने सोलापूर आणि औरंगाबाद इथे झाली. आता 26 नोव्हेंबरला पुण्यात तिसरे अधिवेशन आयोजित केले गेले आहे. 

भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भिमा प्रकरणानंतर राज्यात वंचित आघाडीचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन सोलापुरात पार पडले. या आघाडीत एमआयएम सहभागी झाल्यानंतर दुसरे अधिवेशन औरंगाबादला आयोजित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात अशा अकरा अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबादेतील दुसऱ्या अधिवेशनाला मिळालेल्या यशानंतर आता वंचित आघाडीचा मोर्चा पुण्याकडे वळला आहे. जनतेच्या हितासाठी आवश्‍यक असलेले धोरण वंचित बहुजन आघाडी या अधिवेशनांच्या माध्यमातून मांडणार असल्याचा दावा आघाडीचे नेते करीत आहेत. 

अधिवेशनाचा सोशल मीडियावर प्रचार 
वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यात 26 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या अधिवेशनाचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातून बहुजनांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून सोलापूरनंतर पुण्यातील अधिवेशनही यशस्वी करावे यासाठी जोरदार प्रतारमोहिम राबवून आवाहन केले जात आहे. 

 

संबंधित लेख