bahubali movie | Sarkarnama

"बाहुबली'मुळे बुडाला सरकारचा कोट्यवधींचा महसुल

संजीव भागवत: सरकारनामा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई : देशातील विविध सिनेमागृहात सर्वात जास्त गाजत असलेल्या बाहुबली-2 या चित्रपटातुन कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावला जात असल्याची बाब समोर आली आहे. या चित्रपटादरम्यान प्रेक्षकांना वेठीस धरून अर्धा-अर्धा तास अशा शंभरहून अधिक नियमबाह्य जाहिराती दाखविल्या जात असून या जाहिरातीतून राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल मल्टीप्लेक्‍स सिनेमागृहे बुडवत आहेत. 

मुंबई : देशातील विविध सिनेमागृहात सर्वात जास्त गाजत असलेल्या बाहुबली-2 या चित्रपटातुन कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावला जात असल्याची बाब समोर आली आहे. या चित्रपटादरम्यान प्रेक्षकांना वेठीस धरून अर्धा-अर्धा तास अशा शंभरहून अधिक नियमबाह्य जाहिराती दाखविल्या जात असून या जाहिरातीतून राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल मल्टीप्लेक्‍स सिनेमागृहे बुडवत आहेत. 

प्रेक्षकांना दाखविण्यात येत असलेल्या अर्धा-अर्धा तास आणि त्याहुन अधिक काळच्या जाहिरातीविरोधात फेसबुक, ट्‌विटर आदी सोशल साईडवरही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आल्या असून राज्यभरात ही नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे 

चित्रपटादरम्यान 5 मिनीटापेक्षा जास्तीचा ब्रेक नसावा असा महसूल खात्याचा नियम आहे. मात्र हा नियम डावलून मुंबईसह राज्यातील आइनॉक्‍ससारखी सर्व मल्टीप्लेक्‍स सिनेमगृहे रोज अनधिकृतपणे शेकडो जाहिराती दाखवून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बडवत असून अशा सिनेमागृहावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी प्रशांत जोशी, किशोर बोराटणे, त्रिरत्न इंगळे या प्रेक्षकांनी जिल्हाधिकारी, मुंबई यांच्याकडे केली आहे.त्यासाठीचे एक निवेदन शुक्रवारी देण्यात आले आहे. 

यात त्यांनी बाहुबली हा चित्रपट समुंबईतील आयनॉक्‍स चित्रपटगृहासह सर्व मल्टिप्लेक्‍स आणि सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रपट सुरू आहे. हा चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि मध्यांतरामध्ये जाहिराती दाखविल्या जात आहेत. या जाहिरातींची संख्या च्याही वर असून सुमारे - मिनिटे जाहिराती दाखवून प्रेषकांना वेठीस धरले जात असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

---------- 
नियमावली नसल्याने गैरफायदा 

जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकारी सूत्राने सांगितले की , नेमक्‍या किती जाहिराती दाखवायच्या या संदर्भात मल्टिप्लेक्‍स आदी सिनेमागृहावर वचक बसेल अशी नियमावली नाही, त्याचा हे गैरफायदा घेत आहेत, मात्र यातून सरकारचा कोट्यवधी महसुल बुडत आल्याने ही बाब गंभीर असल्याचेही सूत्राकडून सांगण्यात आले.7 
--------- 

प्रेक्षकांना मनःस्ताप 

4 मे रोजी नरीमन पॉइंट येथील आयनॉक्‍स सीआर 2या मॉलमधील 5 क्रमांकाच्या चित्रपटगृहात रात्री 10.45 च्या खेळादरम्यान आम्हाला हा अनुभव आला.10 .45 चा शो प्रत्यक्षात 11.15 वाजता सुरू झाला व या अर्ध्या तासाच व्यावसायिक जाहिराती दाखविल्या गेल्या. चित्रपटाच्या मध्यंतरातही अशाच प्रकारे तब्बल 38 मिनिटांत 32 जाहिराती दाखविण्यात आल्या. व्यवस्थापनास वारंवार तक्रार आणि विनंती करूनही जाहिराती बंद करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रेषकांना मन:स्ताप सहन करावा लागला. हाच प्रकार सर्व चित्रपटगृहांत मल्टीप्लेक्‍समध्ये होत असल्याची माहिती त्रिरत्न इंगळे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना दिली  

 
 

संबंधित लेख