bagldadshi means poison amit shah | Sarkarnama

बांगलादेशी निर्वासित वाळवीसारखे : शहा 

वृत्तसंस्था
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

जयपूर : बांगलादेशी निर्वासित हे वाळवीसारखे असून, भारतात बेकायदा राहात असलेल्या प्रत्येकाचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्याचा पुनरुच्चार भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केला.

जयपूर : बांगलादेशी निर्वासित हे वाळवीसारखे असून, भारतात बेकायदा राहात असलेल्या प्रत्येकाचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्याचा पुनरुच्चार भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केला.

 शहा यांनी आज सवाई माधोपूर येथे जाहीर सभा घेतली. "राजस्थानमधील भाजप सरकारला कोणीही दूर करू शकत नाही. कॉंग्रेस देशासाठी काहीही चांगले करू शकत नाही. त्यांच्याकडे नेताही नाही आणि धोरणही नाही. आमच्याकडे कामाचा हिशेब मागणाऱ्या राहुलबाबांनी त्यांच्या चार पिढ्यांनी केलेल्या कामाचा आधी हिशेब द्यावा. कॉंग्रेसच्या काळात राजस्थान "बिमारू' होते, मात्र वसुंधराराजे यांच्या काळात हे राज्य प्रगती करत आहे,' असे अमित शहा म्हणाले. 

संबंधित लेख