bagawe and patil scuffle reaches to police station | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

बागवे व पाटील वाद : निवडणुकीपासून ते गणपती मिरवणुकीपर्यंत

ज्ञानेश सावंत
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

पुणे : महापालिका निवडणुकीतील वादातून गणेश विसर्जन मिरवणुकीत कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत राडा घातल्याने पोलिसांनी त्यांना आज अटक केले. बागवे यांचे विरोधक भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार यांच्या मंडळाच्या मिरवणुकीत हा वाद घडला. या वादामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याने तो आणखी वाढत जाण्याची चिन्हे आहेत.

पुणे : महापालिका निवडणुकीतील वादातून गणेश विसर्जन मिरवणुकीत कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत राडा घातल्याने पोलिसांनी त्यांना आज अटक केले. बागवे यांचे विरोधक भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार यांच्या मंडळाच्या मिरवणुकीत हा वाद घडला. या वादामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याने तो आणखी वाढत जाण्याची चिन्हे आहेत.

मिरवणुकीतील गाणी आणि कार्यकर्त्यांच्या नाचण्यावरून हा वाद सुरू झाला. राजकीय द्वेषातून बागवेंनी चिथावणी देत जाणीवपूर्वक गणेशभक्तांचा अवमान केला आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे. तर, मुद्दामहून पाटील आमच्या कार्यालयासमोर नाचत होते. तेव्हा समजावून सांगताना वाद घातल्याचे बागवे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय संघर्ष भडकण्याची चिन्हे आहेत. याआधीही प्रभागातील कामांवरून या दोघांमधील अनेकदा वाद उफाळून आला आहे.

 
हा वाद मिरवणुकीवरून झाला असला तरी, त्याचे खरे कारण हे राजकीय संघर्षात आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून अर्चना पाटील या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. बागवेही याच प्रभागातून निवडून आले आहेत. तेव्हापासून बागवे-पाटील यांच्यातील वादात भर पडली. या निवडणुकीत पाटील यांनी कॉंग्रेसच्या हिना मोमीन यांना पराभूत केले. 

कासेवाडी भागात पाटील यांचे अशोक तरुण मंडळ आहे. महापालिका निवडणुकीत यश मिळाल्याने गेल्या वर्षीपासून पाटील हे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मिरवणुकीच्या आदल्यादिवशी म्हणजे, शनिवारी गाण्यांवरून बागवे आणि पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाला. तो पोलिसांपर्यंत पोचला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना समज दिली. त्यानंतर मिरवणुकीदरम्यान, पुन्हा या गटांमध्ये वाद झाला.

"मिरवणूक पुढे नेण्याची विनंती बागवे यांच्या कार्यकर्त्यांना अशोक मंडळाच्या कार्यकर्त्यांना केली. ती पुढे सरकत असतानाच बागवेंच्या एका कार्यकर्त्याने अशोक मंडळाच्या मिरवणुकीतील ट्रॅक्‍टर चालक सोमनाथ मस्के आणि साऊंड सिस्टिम मालक ओंकार कोळी यांना मारहाण केली. त्याचवेळी अन्य दहा ते बारा कार्यकर्त्यांनीही मारहाण केली. तेव्हा "मारा रे ओढा' असे सांगून बागवे यांनी चिथावणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटने गणेशमूर्तीची विटंबना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 
प्रभागातील पार्किग सुविधा, रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणासह अन्य कामावरून बागवे आणि पाटील यांच्यात वाद झाले आहे. अन्य विषयांवरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपही होतात. महापलिका निवडणुकीपासून सुरू झालेला हा वाद वैयक्तिक पातळीवर पोचला आहे. एकमेकांचे राजकीय वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न या दोघांमध्ये होत असल्याचेही दिसून आले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हा वाद आणखी चिघळत राहण्याची शक्यता आहे.  

 

संबंधित लेख