bagade khotkar and girish mahajan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

बागडे, खोतकरांनी केले गिरीश महाजनांचे अभिनंदन

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : जळगाव महापालिकेवर शिवसेना पयार्याने माजी आमदार सुरेश जैन यांची चाळीस वर्षापासून असलेली सत्ता भाजपने आज उलथवून टाकली. अर्थात या यशाचे मानकरी ठरले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. शिवसेनेचा पराभव करत भाजपने जळगांव महापालिकेत 57 जागा पटकावत बहुमत मिळवल्याने या विजयाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या गिरीश महाजनांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर असाच गिरीश महाजन यांच्या कौतुकाचा सोहळा रंगला होता. जळगाव महापालिकेत बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतर महाजन जळगावहून मुंबईला जाण्यासाठी सायंकाळी विमानतळावर आले होते.

औरंगाबाद : जळगाव महापालिकेवर शिवसेना पयार्याने माजी आमदार सुरेश जैन यांची चाळीस वर्षापासून असलेली सत्ता भाजपने आज उलथवून टाकली. अर्थात या यशाचे मानकरी ठरले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. शिवसेनेचा पराभव करत भाजपने जळगांव महापालिकेत 57 जागा पटकावत बहुमत मिळवल्याने या विजयाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या गिरीश महाजनांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर असाच गिरीश महाजन यांच्या कौतुकाचा सोहळा रंगला होता. जळगाव महापालिकेत बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतर महाजन जळगावहून मुंबईला जाण्यासाठी सायंकाळी विमानतळावर आले होते. तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर मुंबईहून औरंगाबादला आले. 

गिरीश महाजन मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर येणार असल्याचे कळाल्यामुळे बागडे यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्याचे ठरेल. काहीवेळातच भलामोठा हार आणि पुष्पगुच्छ आणण्यात आला. हरिभाऊ बागडे यांनी गिरीश महाजन यांना हार घालत त्यांचे तोंड गोड केले आणि जळगाव महापालिकेतील विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 

खोतकरांनीही दाखवला मनाचा मोठेपणा 
जळगाव महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेचा दारूण पराभव झालेला असतांना राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना गिरीश महाजन यांचे अभिनंदन करावे लागले. त्यांनीही मनाचा मोठपणा दाखवत गिरीश महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सुरेश जैन यांच्या सारखा मातब्बर नेता, राज्यमंत्री गुलाबराव पाटीलांचे आक्रमक नेतृत्व असतांना शिवसेनेला मात्र पराभव पत्करावा लागला. याबद्दल मात्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

संबंधित लेख