bagade and khaire | Sarkarnama

हरिभाऊ बागडेंनी मार्केट कमिटीची जागा विकून पैसे घेतले - चंद्रकांत खैरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

औरंगाबाद : हरिभाऊ बागडे यांच्या ताब्यात असलेल्या मार्केट कमिटीत सध्या जो कारभार सुरू आहे तो काही बरोबर नाही. बागडेंच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटीच्या मालकीच्या अनेक जागा हडप करण्यात आल्या आहेत, तर काही विकून त्याचे पैसे खाण्यात आले. हरिभाऊ बागडे यांनी देखील पैसे घेतले असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 

शहरातील राजाबाजार आणि मोंढा परिसराला अनेक वर्षांच्या कचराकोंडीतून मुक्त केल्याबद्दल येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका यशश्री बाखरिया यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात जीएसटी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांची होणारी लूट यावर खैरेंनी कडाडून हल्ला चढवला. 

खैरे म्हणाले, जीएसटीमुळे व्यापाऱ्यावर मोठे संकट आले आहे, वीस रुपयांचा जीएसटी भरला नसेल तर त्या व्यापाऱ्यावर धाडी टाकून कोट्यावधी रुपयांचा दंड केला जातोय. औरंगाबादेत दोन-तीन ठिकाणी असा प्रकार झाला पण मी दम भरल्यानंतर धाडीचे प्रकार थांबले. आज जीएसटी आणि सगळ्या व्यवहारांची माहिती, हिशोब ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना दरमहा 20-25 हजार रुपये खर्च करून सीएची नियुक्ती करावी लागणार आहे. हा सगळा व्यापाऱ्यांना छळण्याचा प्रकार आहे. 

मार्केट कमिटीकडून व्यापाऱ्यांची लूट 
मार्केट कमिटीकडून व्यापाऱ्यांची अक्षरशः लूट सुरू आहे. सध्याच्या संचालक मंडळाकडून व्यापाऱ्यांच्या नुसत्या मुंड्या मोडून पैसे उकळण्याचे काम सुरू आहे. मी पालकमंत्री असतांना मार्केट कमिटीत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. व्यापाऱ्याकडून पैसे घेतले नाही तर उलट मी पैसे लावले. मार्केट कमिटीवरील तेव्हाचे कर्ज आणि व्याज देखील माफ करून दिले. 

नुसते आरोप नको, पुरावे द्या- हरिभाऊ बागडे 

मार्केट कमिटीच्या जागा हडप केल्या, विकल्या पैसे घेतले असे नुसते आरोप चंद्रकांत खैरेंनी करू नयेत. त्यांच्याकडे याचे पुरावे असतील तर ते द्यावेत अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरे यांचे आरोप फेटाळून लावले. 

संबंधित लेख