Badole Sawvra and Lonikar may be removed from the Cabinet | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

मंत्री बडोले, सावरा आणि लोणीकरांचा होणार पत्ता कट

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

सामाजीक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जागी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना बढती मिळणार असून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याऐवजी संघ परिवारातील खासदार चिंतमण वनगा यांच्या नावाचीही चर्चा करण्यात आली असून सावरांच्या कामगिरीवर भाजप कोअर कमिटी समाधानी नसल्याने त्यांना सन्मानाने नारळ देण्यात येणार आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर घेतलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा पत्ता कट होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदी प्रमुख नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यानी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला असून यामध्ये मतदार संघातील मंत्र्यांच्या कामाची विशेष दखल घेतली असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानुसार सतत वादग्रस्त विधान करून अडचण निर्माण करण्याऱ्या मंत्र्यांविषयी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सामाजीक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जागी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना बढती मिळणार असून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याऐवजी संघ परिवारातील खासदार चिंतमण वनगा यांच्या नावाचीही चर्चा करण्यात आली असून सावरांच्या कामगिरीवर भाजप कोअर कमिटी समाधानी नसल्याने त्यांना सन्मानाने नारळ देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर व आदिवासी विकास राज्यमंत्री अब्रीशराजे अत्राम यांच्या पर्यायांचीही चर्चा करण्यात आले असल्याचे समजते. कोअर कमिटीच्या या चर्चेचा आवाहाल पक्षाकडे पाठवण्यात येणार असून त्यानुसार या मंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

संबंधित लेख